नॅनो नाव ठेवावे का स्कूटर हा त्यांचा अधिकार – अजित पवार

Advertisements
Advertisements
Spread the love

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा ‘छोटा’ (नॅनो) मोर्चा असा टोला लगावला. फडणवीसांच्या या टीकेला विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी उत्तर दिले आहे. तसेच मोर्चासाठी पैसे देऊन लोक जमवल्याचा आरोपावरही त्यांनी भाष्य केले आहे. उपमुख्यमंत्र्यांना नॅनो म्हणायचे आहे की इतर काही याचा त्यांना लखलाभ असा टोलाही त्यांनी लगावला.

Advertisements

भाजपा नेते केशव उपाध्ये यांनी मोर्चासाठी जमलेल्यांना पैसे वाटले जात असल्याचा एक व्हिडीओ ट्विटरला शेअर करण्यात आला आहे. पैसे देऊन लोक जमवल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला आहे. अजित पवार यांना याबद्दल विचारण्यात आले असता ते म्हणाले की “माझ्या माहितीप्र्माणे तसे अजिबात झालेले नाही. मी सुरुवातीपासून शेवटपर्यंत मोर्चात होतो. मोर्चा संपल्यानंतरही मी काही काळ तेथील लोकांशी बोलत होतो. अशाप्रकारे काहीही झाले नाही. मला लोक पैसे घेऊन आणलेले दिसले नाहीत. कारण नसताना बदनामी करण्याची गरज नाही”.

Advertisements
Advertisements

“उपमुख्यमंत्र्यांनी नॅनो नाव ठेवावे का स्कूटर ठेवावे हा त्यांचा अधिकार आहे. आम्ही त्याला फार महत्व देत नाही,” असेही ते म्हणाले. “आम्ही दोन दिवस आधीच देवगिरी बंगल्यावर पत्रकार परिषद घेतली तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, सावित्रीबाई फुले. भाऊराव पाटील या सर्व महापुरुष, स्त्रियांबद्दल जी बेताल वक्तव्ये केली जात आहेत, त्यासाठी इच्छुक नागरिकांनी मोर्चात सहभागी व्हावे असे आवाहन केले होते. त्याप्रमाणे नागरिक सहभागी झाले होते,” असे अजित पवार यांनी सांगितले. “आमच्या दृष्टीने या मोर्चाच्या निमित्ताने महाविकास आघाडीची एकी दिसली आहे. सहा महिन्यांनी आम्ही असा एकत्र मोर्चा काढला आहे. आम्ही या मोर्चाबाबत समाधानी आहोत,” असेही ते म्हणाले. उपमुख्यमंत्र्यांना नॅनो म्हणायचे आहे की इतर काही याचा त्यांना लखलाभ असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला आहे.

धक्कादायक पालघरमध्ये अल्पवयीन मुलीवर सामुहिक बलात्कार


News Updates on one click
https://www.mahanayakonline.com

Like | share | subscribe
https://youtube.com/c/MahanayakOnline

For current Updates join
https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ

For MahaClassifide
https://chat.whatsapp.com/Hza5pvz90csG19UCftrmDY

📢 जाहिरातीसाठी संपर्क – 9028150765 / 9420379055

आपलं सरकार

Click to listen highlighted text!