Aurangabad : उधार दिलेले पैसे सर्वांसमोर मागितल्याने तरुणाची हत्या

Advertisements
Advertisements
Spread the love

औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात उधार दिलेले पैसे सर्वांसमोर मागितले याचा राग आल्याने २१ वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आली आहे. त्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने तरुणाचा मृतदेह प्लास्टिक आणि साडीमध्ये गुंडाळून पाईपमध्ये लपविण्यात आला होता. पोलिसांनी या हत्याकांडाचा तपास लावत तीन आरोपींना अटक केली.

Advertisements
(aurangabad Maharashtra)

सागर संतोष जैस्वाल (वय २१) असे हत्या झालेल्या तरूणाचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी पंढरीनाथ परसराम वाघचौरे (वय २८ वर्षे, रा. धनगरवाडी, औराळा ता. कन्नड), काकासाहेब परसराम वाघचौरे (वय ३४ वर्षे, रा. धनगरवाडी, औराळा,कन्नड), दिनेश उर्फ पप्पु संताराम साळूंके (वय २२ वर्षे, रा. कविटखेडा ता. कन्नड) या आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे आहेत.

Advertisements
Advertisements

सागर गेल्या २० नोव्हेंबर पासून बेपत्ता होता. सागरच्या नातेवाईकांनी तो बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसांत दाखल केली होती. दरम्यान, कन्नड तालुक्यातील औराळा येथील पेडकवाडी घाटातील पाईपमध्ये तरुणाचा मृतदेह आढळून आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पाहणी केली असता मृतदेह प्लास्टिक आणि साडीमध्ये गुंडाळलेला होता.

बेपत्ता असलेल्या सागरच्या वर्णनाशी मृतदेहाचे वर्णन मिळते जुळते असल्याने पोलिसांनी सागरच्या नातेवाईकांना बोलावून घेतले व तो मृतदेह सागरचाच असल्याची ओळख कुटुंबीयांनी पटवली. पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करत तपासाला सुरुवात केली असता काही दिवसापूर्वी त्याचा वाद झाल्याची माहिती पोलिसांना तपासात मिळाली.

पोलिसांनी तिन्ही संशयित तरुणांना तब्यात घेऊन विचारपूस केली असता सागर ने सर्वांसमोर उधार दिलेल्या पैशांची मागणी केली होती. त्यामुळे रागाच्या भरात सागरची हत्या करून मृतदेह पाईपमध्ये लाविल्याची कबुली आरोपींनी पोलिसांना दिली. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

अखेर प्रसाद लाड यांनी दिलगिरी व्यक्त केली

MaharashtraNewsUpdate : ‘हर हर महादेव’ वरून झी टीव्हीला संभाजी राजे यांचा इशारा …

aurangabad

News Update on one click
https://www.mahanayakonline.com

Like | share | subscribe
https://youtube.com/c/MahanayakOnline

For current updates join
https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ

For MahaClassifide
https://chat.whatsapp.com/Hza5pvz90csG19UCftrmDY

📢 जाहिरातीसाठी संपर्क – 9028150765 / 9420379055

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!