Aurangabad News Update : सोयगावच्या रुपालीचे गायन स्पर्धेत यश…

मनिषा पाटील | सोयगांव : परभणी येथील डिझायर सेवा भावी संस्थेचे महंमद इलीयास यांनी आयोजित केलेल्या खुल्या राष्ट्रीय फिल्म गीत गायन स्पर्धेत सोयगांवच्या रुपाली निलेश महाजन यांनी द्वितीय क्रमांक पटकवला ट्रॉफी आणि पन्नास हजार रुपये असे बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले.
परभणी येथील महात्मा फुले विदयालय येथे दि.१९ सप्टेंबर रोजी डिझायर सेवा भावी संस्थेचे महंमद इलियास यांनी खुल्या राष्ट्रीय फिल्मी गीत गायन स्पर्धा आयोजित केली होती. स्पर्धेत एकूण ८० स्पर्धक सहभागी झालेले होते तब्बल १४ तास चाललेल्या स्पर्धेत हैद्राबाद येथील मजहर बाजबेर यांनी प्रथम सोयगांव येथील रुपाली निलेश महाजन यांनी द्वितीय तर परभणी येथील जलील साहेब यांनी तृतीय क्रमांक घेतला.
रुपाली महाजन यांच्या यशाबद्दल सोयगांव प्रशाळेचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक एकनाथ महाजन, निलेश महाजन, सोयगाव व्यापारी महासंघाचे अध्यक्ष विवेक महाजन,विशाल महाजन,मित्र राजेंद्र दुत्तोंडे,योगेश बोखारे, प्रमोद रावणे,निकेश बिर्ला,यांच्या सह सोयगांव येथील नागरिकांनी अभिनंदन केले आहे.