Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Aurangabad News Update : धक्कादायक : प्रसिद्ध बिल्डर अनिल आग्रहरकर यांची आत्महत्या…

Advertisements
Advertisements
Spread the love

औरंगाबाद : औरंगाबाद  शहरातील प्रसिद्ध बिल्डर अनिल आग्रहारकर यांनी आत्महत्या केली असल्याचे  वृत्त आहे. अनिल आग्रहारकर यांच्या आत्महत्येमुळे बांधकाम श्रेत्रामध्ये खळबळ उडाली आहे.

Advertisements

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिल माधवराव आग्रहारकर (वय ५५ ) यांनी उल्कानगरी येथील आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. बुधवारी रात्री कुटुंबीयांसोबत जेवण घेतल्यानंतर ते खोलीत झोपण्यासाठी गेले होते. दरम्यान सकाळी ८.३० वाजले तरी ते खोलीतून बाहेर आले नाही. त्यामुळे खोलीत डोकावून पाहिले असता आग्रहारकर यांनी आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले.

Advertisements
Advertisements

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळाला भेट देऊन  त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला  आहे.

आग्रहारकर हे औरंगाबादमध्ये यशस्वी बांधकाम व्यावसायिक म्हणून ओळखले जात होते. उल्कानगरिसह शहरात त्यांचे अनेक ठिकाणी गृहप्रकल्प आणि व्यावसायिक प्रकल्प सुरू आहेत. दरम्यान काही लोकांच्या धमकीच्या कॉलमुळे ते त्रस्त होते अशी माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी पोलिसांना दिली आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!