AurangabadNewsUpdate : वाहन तपासणीत चिकलठाणा पोलिसांना आढळले एक किलोचे सोन्याचे दागिने !!

औरंगाबाद : औरंगाबाद -जालना रोडवर वाहनांची तपासणी करीत असताना रात्री १०.३० वा.केंब्रीज शाळेजवळ चिकलठाणा पोलिसांना मुंबईतील एका व्यापाऱ्याच्या गाडीत एक किलो सोन्याचे दागिने आढळून आले. आपण ज्वेलरीचा व्यवसाय करीत असून मुंबईहून सोन्याची मार्केटिंग करण्याकरता आलो असल्याची माहिती या व्यापाऱ्याने दिली असून त्याची अधिक चौकशी केली जात असल्याची माहिती उपविभागिय पोलीस अधिकारी देवदत्त भंवर यांनी दिली आहे.
याबाबत आणखी माहिती देताना भंवर म्हणाले कि , चिकलठाणा पोलीस रात्रीची गस्त घालत असताना आणि जालना रोडवरील वाहनांची तपासणी करीत असताना एका व्यापाऱ्याला थांबवून त्यांच्या गाडीची झडती घेतली असता गाडीत एक किलो सोन्याचे घडवलेले दागिने आढळून आले. याबाबत माहिती देताना या व्यापाऱ्याने सांगितले कि , त्याचे नाव जैन असून त्याने दिवसभरात शहरातील सराफा बाजारातील व्यापाऱ्यांना स्वत:जवळील ज्वेलरी दाखवून तो जालन्याकडे जाण्यासाठी निघाला होता.
दरम्यान त्याच्याकडे आढळून आलेल्या एक किलो सोन्याच्या दागिन्यांबद्दल पोलिसांनी चौकशी करून या दागिन्यांच्या पावतीबाबत विचारणा केली असता जैन यांनी पोलिसांना व्हाॅट्सअॅपवरील दागिन्याची पावती दाखवली परंतु ओरिजनल पावतीची मागणी करीत पोलिसांनी सदर व्यापाऱ्याला थांबवून धरले आहे. दरम्यान जैन यांनी मुंबईत संपर्क करुन घरुन दागिन्यांची पावती मागवली आहे.
सदर प्रकरणात पोलिस निरीक्षक गात यांनी याबाबत माध्यमांना माहिती देण्याचे टाळले तेंव्हा हा या प्रकरणाची माहिती मिळताच उपविभागिय अधिकारी भंवर घटनास्थळी दाखल झाले आणि ग्रामीण जिल्हा पोलिस अधिक्षक कनवालिया यांच्यामार्गदर्शनांतर भंवर यांंनी शहरातील सराफा व्यापार्यांना बोलावून त्यांचे जबाब नोंदविण्याचे आदेश चिकलठाणा पोलिसांना दिले. अधिक चौकशी चालू आहे. या संदर्भातआयकर विभागाशीही पोलिस अधिक्षक कार्यालयाने संपर्क साधून घटनेची माहिती दिल्याचे भंवर यांनी शेवटी सांगितले.