Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadCrimeUpdate : अल्पवयीन मुलासोबत अनैसर्गिक कृत्य , हमाल अटकेत

Advertisements
Advertisements
Spread the love

औरंगाबाद – उन्हाळ्याच्या सुट्टीत आजोळी आलेल्या १३ वर्षीय मुलाला दमदाट्या करुन अनैसर्गिक कृत्य करणार्‍या हमालाला वाळूज पोलिसांनी आज दुपारी २ वा. अटक केली.


बाबू पुंजू सोनवणे(४२) असे अटक आरोपीचे नाव आहे. पिडीत हा एका आठवड्यापूर्वी वाळूजला त्याच्या आजीकडे राहण्यास आला होता.आजीकडे किरायाने आरोपी गेल्या ९ महिन्यांपासून राहात होता. तो मूळचा जळगावचा असून बायको व मुलांना सोडून उदरनिर्वाहासाठी वाळूजला राहात होता.

Advertisements

दोन दिवसांपासून आरोपी पिडीत मुलाला मोबाईल खेळण्यास देत होता.आज दुपारी दीड वा. आरोपीने लहानग्याला घरात नेत अनैसर्गिक कृत्य करायला भाग पाडले. पिडीत मुलाच्या आजीला संशय आल्यामुळे त्यांनी आरोपीच्या घरात डोकावताच पिडीत मुलगा अनैर्सगिक कृत्य करंत असल्याचे आजीने पाहिले.त्यांनी ताबडतोब पोलिसांनामाहिती देत आरोपी पोलिसांच्या हवाली केला. या प्रकरणी पुढील तपास पोलिस निरीक्षक सचिन इंगोले यांच्या मार्गदर्शनाखाली वाळूज पोलिस करंत आहेत.

Advertisements
Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!