Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraPoliticalUpdate : राज्यातील ‘वाईन’च्या वादावर शरद पवारांचे म्हणणे असे आहे !!

Advertisements
Advertisements
Spread the love

पुणे  : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कोरोनावर मात केल्यानंतर राज्यातील वाईन प्रश्नावरून होणाऱ्या चर्चेवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. वाईन प्रकरणावर भाष्य करताना पवार यांनी म्हटले आहे कि , राज्य सरकारच्या निर्णयाला होत असलेला विरोध हा चिंतेचा विषय नसून हा निर्णय सरकारने बदलला तरीही वाईट वाटण्याचे कारण नाही.


पत्रकारांशी बोलताना पवार  पुढे म्हणाले कि , राज्य सरकारने सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीला दिलेली परवानगी आणि त्याला होत असलेला विरोध हा काही फार चिंतेचा विषय नाही. सरकारच्या निर्णयाला जर अनेक स्तरातून विरोध होत असेल आणि राज्य सरकारने या संदर्भात निर्णय बदलला तरी त्याचे मला वाईट वाटण्याचे कारण नाही असेही पवार यांनी स्पष्ट केले.

Advertisements

वाईन शेतकऱ्यांसाठी आर्थिक उत्पन्नाचे साधन

खरे तर  देशभरातील सर्वच राज्यांमध्ये दुकानांमध्ये देशी आणि विदेशी दारू मिळते. त्यामध्ये वाईन चा खप अत्यंत तुलनेने कमी आहे. देशातील सर्वाधिक द्राक्ष उत्पादन हे नाशिक जिल्ह्यात होते. या जिल्ह्यामध्ये 18 वाईनरी आहेत 18 वाईनरी उत्पादन घेतात. ही वाईन केवळ मोठ्या मॉल्समध्ये विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यासंदर्भात सरकारने मंजुरी दिली आहे. वायनरींच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक उत्पन्न मिळते. मात्र त्याला विरोध होत असेल तर सरकारने या संदर्भात काही वेगळा निर्णय घेतला तरी वाईट वाटायचे कारण नाही असेही पवार यांनी म्हटले.

Advertisements
Advertisements

दरम्यान  शरद पवार यांनी पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांबाबतही आपले मत मांडले. दिल्लीच्या सीमेवर वर्षभर शेतकरी आंदोलनाला बसले होते. आंदोलनामुळे केंद्र सरकारने कायदे मागे घेतले. पण त्यांच्या आश्वासनांची पूर्तता झाली नाही. याची किंमत भाजप सरकारला मोजावी लागणार असल्याचे शरद पवार यांनी सांगितले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!