Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraNewsUpdate : अखेर अटकपूर्व जामिनाचा नाद सोडून आ. नितेश राणे यांची शरणागती, न्यायालयीन कोठडीत रवानगी

Spread the love

मुंबई : भाजप आमदार नितेश राणे यांना शिवसेना कार्यकर्ते संतोष परब हल्ला प्रकरणी न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्न केल्यानंतर कुठेही दिलासा न मिळाल्याने न्यायालयातील जामीन याचिका परत घेत नितेश राणे सिंधुदुर्ग सत्र न्यायालयात आज शरण आल्यानंतर त्यांना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली.


दरम्यान न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर आता नितेश राणे यांचे वकील जामिनासाठी आवश्यक असलेली प्रक्रिया पूर्ण करत आहेत.तर सरकारी पक्षाकडून नितेश राणे यांची पाच दिवसांची पोलीस कोठडीची मागणी केली जात आहे. त्यामुळे नितेश राणे यांना जामीन मिळणार की नाही याबाबत अद्याप कोणत्याही प्रकारचे स्पष्टीकरण मिळालेले नाही.

न्यायालयाने नितेश राणेंचा अटक पूर्व जामीन अर्ज फेटाळताना सुप्रीम कोर्टाने त्यांना अटकेपासून 10 दिवसांचे संरक्षण दिले होते. नितेश राणे यांनी १० दिवसांत सिंधुदुर्ग सत्र न्यायालयापुढे शरण जाण्याचे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले होते. दरम्यान नियमित जामीनासाठी राणे यांनी सत्र न्यायालयात अर्ज करावा असेही निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले होते. न्यायालयाने नितेश राणे यांचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर जामिनासाठी नितेश राणे उच्च न्यायालयात अर्ज करणार होते. परंतु, अचानक आपला जामीन अर्जाचा निर्णय बदलून ते जिल्हा सत्र न्यायालयाला शरण आले.

दरम्यान, न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर नितेश राणे यांनी न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करतो अशी प्रतिक्रीया दिली आहे. काल सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयाने जो निर्णय दिला. त्या निर्णयाचा आदर ठेवून मी आता शरण जात आहे. आतापर्यंत राज्य सरकारने वेगवेगळ्या पद्धतीनं, बेकायदेशीर पद्धतीने मला अटक करण्याचा प्रयत्न केला. मात्र मी आज स्वतःहून न्यायालयाच्या निर्णयाचा आदर ठेवून शरण जात आहे.” असे नितेश राणे यांनी म्हटले होते.

नितेश राणे यांच्या अटकेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी कणकवली न्यायालया बाहेर मोठा पोलीस बंदोबस्त लावला होता. न्यायालयाबाहेर दंगल नियंत्रक पथकही तैनात करण्यात आले आहे. संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी नितेश राणे यांच्यावर पोलिसांनी कलम 307 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे त्यांच्यावर अटकेची तांगती तलवार होती. अनेक दिवस राणे पोलिसांनाही मिळाले नव्हते.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!