Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

ParliamentNewsUpdate : गेल्या  50 वर्षात आज देशात आज सर्वाधिक बेरोजगारी : राहुल गांधी यांचे मोदी सरकारवर टीकास्त्र

Spread the love

नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बुधवारी लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावात मोदी सरकारवर जोरदार टीका केली. ते म्हणाले कि ,  राष्ट्रपतींच्या अभिभाषणात बेरोजगारीवर एक शब्दही नव्हता. रोजगाराबाबत केंद्रावर निशाणा साधत काँग्रेसचे माजी अध्यक्ष म्हणाले की, देशातील तरुण रोजगार शोधत आहेत. आपले सरकार रोजगार देण्यास असमर्थ आहे. गेल्या वर्षी ३ कोटी तरुणांनी नोकऱ्या गमावल्या. गेल्या  50 वर्षात आज देशात सर्वाधिक बेरोजगारी आहे.


आपल्या भाषणात राहुल गांधी म्हणाले कि , आता  देशात दोन वेगळे भारत आहेत, एक श्रीमंतांसाठी आणि दुसरा गरीबांसाठी. दोघांमधील दरी रुंदावत चालली आहे, असे ते म्हणाले. ते म्हणाले, “माझ्या मते तीन मूलभूत गोष्टी आहेत: पहिली, एक भारत नसून दोन भारत आहेत अशी कल्पना आहे. एक अतिशय श्रीमंत लोकांसाठी आहे, ज्यांच्याकडे अमाप संपत्ती आहे. आणि ज्यांना नोकऱ्यांची गरज नाही तर  दुसरी गरीबांसाठी आहे.”

तुम्ही केवळ बेरोजगारी वाढवत आहात

“तुम्ही मेड इन इंडिया, मेड इन इंडियाच्या गप्पा मारता. मेड इन इंडिया आता शक्य नाही. तुम्ही ‘मेड इन इंडिया’ला उद्ध्वस्त केले आहे. तुम्ही छोट्या आणि मध्यम उद्योगांला पाठिंबा देण्याची गरज आहे. ते करायला हवे. अन्यथा ‘मेड इन इंडिया’ शक्य नाही. फक्त लघु आणि मध्यम उद्योगच रोजगार निर्माण करू शकतात. “तुम्ही  केवळ मेड इन इंडिया, स्टार्टअप इंडिया इत्यादीबद्दल बोलत आहात आणि केवळ बेरोजगारी वाढवत आहात.

नरेंद्र मोदीजींनी हे केले आहे …

तुम्ही जो गरीब भारत बनवत आहात, तो गप्प राहील, असा विचार करू नका, तो गप्प बसणार नाही. हा भारत पाहत आहे की आज भारतातील 100 श्रीमंत लोकांकडे भारतातील 55 कोटी लोकांपेक्षा जास्त मालमत्ता आहे, हे काम नरेंद्र मोदीजींनी केले आहे. “भारतातील 84 टक्के लोकांचे उत्पन्न कमी झाले आहे आणि ते वेगाने गरिबीकडे वाटचाल करत आहेत. आम्ही 27 कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढले आणि तुम्ही 23 कोटी लोकांना पुन्हा गरिबीच्या खाईत लोटले.”

केंद्र -राज्य संवाद प्रक्रिया बंद केली जात आहे

राहुल गांधी पुढे म्हणाले कि , “मी आणीबाणीवरही बोलेन. त्यावर बोलायला मी घाबरत नाही. राजा ही कल्पना मागे पडली आहे, जी 1947 मध्ये काँग्रेसने रद्द केली होती. पण आता सम्राट आहे कारण  आता आपली राज्ये आणि लोकांमधील संवादाच्या साधनांवर एखाद्या कल्पनेने आक्रमण केले जात आहे. त्यामुळे आज तामिळनाडूची कल्पना भारतीय संस्थाबाहेर ठेवण्यात आली आहे. तुम्ही इथून निघून जा म्हणत आहात. त्यांना आवाज नाही. पंजाबचे शेतकरी उभे राहू शकतात, पण त्यांचा आवाज नाही. कोरोना व्हायरसच्या महामारीमुळे झालेल्या आंदोलनात लोकांनी आपले प्राण गमावले, पण राजाने ऐकले नाही.”

देशभरातील तरुण रोजगार शोधताहेत

रोजगारासाठी उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये तरुणांनी जे आंदोलन केले . त्याबद्दल कोणीच बोलत नाही. गरीब भारताजवळ रोजगार नाही, पण त्याबद्दल कोणीच बोलत नाही.  देशभरातील तरुण रोजगार शोधताहेत. त्यांना फक्त रोजगार हवा आहे, परंतु मोदी सरकार त्यांना रोजगार देऊ शकत नाही आहे, दरम्यान त्यांच्या भाषणाच्या वेळी सत्ताधारी पक्षाने गोंधळ घातला असता ते म्हणाले कि , केंद्र सरकारला टीका का सहन होत नाही, असा सवाल करून त्यांनी आरोप केला  कि , न्यायपालिका, निवडणूक आयोग आणि पेगासस हे जनतेचा आवाज दडपण्यासाठी वापरण्यात येणारी साधणं आहेत.

अर्थसंकल्पीय अधिवेशन ११ फेब्रुवारीपर्यंत

राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावर आजपासून चर्चा सुरू झाली आहे. तर ३१ जानेवारीपासून सुरू झालेले अर्थसंकल्पीय अधिवेशन ११ फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. अधिवेशनाचा पहिला टप्पा पूर्ण झाल्यानंतर १२ फेब्रुवारी ते १३ मार्च अशी एक महिन्याची सुट्टी असेल. दुसरा टप्पा १४ मार्चपासून सुरू होणार असून ८ एप्रिलपर्यंत चालणार आहे. या अधिवेशनात मंत्रालयांच्या अनुदानाच्या मागण्यांवर चर्चा होणार आहे. सोबतच संबंधित विभागाचे मंत्री उत्तर देतील. अर्थसंकल्पावरील चर्चा आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या उत्तरानंतर अनुदान आणि वित्त विधेयकाच्या मागण्या मंजूर केल्या जातील. यादरम्यान पंतप्रधान मोदी ७ किंवा ८ फेब्रुवारीला उत्तर देतील. अर्थमंत्री निर्मला सीतारामन ११ फेब्रुवारीला उत्तर देतील.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!