AurangabadNewsUpdate : सी.सी.टि.व्ही.आॅर्ब्झवर ठेवलाच पाहिजे : पोलिस उपायुक्त गिते

औरंगाबाद- शहरातील सोने चांदी आणि मौल्यवान रत्ने विक्री करणार्या व्यापार्यांनी आपल्या दालनात एक विशेष सी.सी.टि.व्ही आॅर्ब्झवर ठेवलाच पाहिजे.त्यामुळे मौल्यवान वस्तू खरेदीसाठी येणार्या ग्राहकांची बाॅडी, लँग्वेज, भाषा पेहराव याचे बारिक निरीक्षण करण्यात यावे. यासाठी एखाद्या विशेष व्यक्तीची नेमणूक त्यासाठी करावी.अशी सूचना पोलिस उपायुक्त अपर्णा गिते यांनी केली आहे.
शहरात दोन दिवसांपूर्वी जालनारोडवरील मलबार गोल्ड शोरुम मधून बुरखाधारी महिलेने दागिने पहाण्याचा बहाणा करंत दीड लाखांची रत्नजडीत बांगडी लंपास केली.हा प्रकार दुसर्या दिवशी शोरुम मधील कर्मचार्यांच्या लक्षात आला.यापूर्वीही अशा बुरखाधारी महिलांनी सोन्या चांदीचे दागिने लंपास केल्याचे गुन्हे दाखल असल्याची माहिती आपल्या सहकार्यांनी दिल्याचे गिते म्हणाल्या.ज्या प्रमाणे विमानतळावर प्रवाशांचे निरीक्षण करण्यासाठी त्यांना टेकआॅफ च्या काही तास आधि बोलावले जाते.व त्यांचे सी.सी.टि.व्ही.द्वारे निरीक्षण केले जाते.तशा पध्दतीचा अवलंब सोने चांदी व्यापार्यांनी करायला हवा.निदान आलेल्या ग्राहकांना दालनात प्रवेश करताच योग्य ते आदरातिथ्य करावे त्याच दरम्यान सी.सी.टि.व्ही.च्या माध्यमातून ग्राहकांची देहबोली, भाषाशैली याचे निरीक्षण करंत संशय वाटल्यास पोलिसांशी संपर्क करावा.अशा पध्दतीचा अवलंब करण्याची गरज सध्या निर्माण झाली आहे.त्यासाठी लवकरंच आपण सराफ असोशिएशनची एक बैठक बोलावून या नव्या कल्पनेवर प्रतिक्रिया मागवू असे शेवटी गिते म्हणाल्या.