AurangabadCoronaLatestUpdate : लाॅकडाऊनबद्दलचा निर्णय उद्याच्या बैठकीत

औरंगाबाद जिल्ह्याच्या लॉकडाऊन बद्दल कोणताही निर्णय नाही. मात्र सोमवारी सर्व अधिकाऱ्यांशी चर्चा करून परिस्थिती नुसार निर्णय घेऊन निर्बंध वाढवण्यात येईल, सर्व गोष्टीवर प्रशासनाचे बारीक लक्ष आहे, नागरिकांनी नियम पाळावेत असे आवाहन प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. गव्हाणे यांनी केले आहे.
सध्या शहरात रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आलेली असली तरी गेल्या आठवड्यापासून कोरोनाबाधीतांची संख्या वाढत असल्याने प्रशासन अधिक सतर्क झाले आहे. दरम्यान काल कोरोनाबाधितांची संख्या ४५९ वर गेल्यामुळे आणि ५ मृत्यू झाल्याने शहरात कडक लाॅकडाऊनबाबत चर्चा सुरू झाली आहे. मात्र तूर्त असा कुठलाही निर्णय झाला नसल्याचे गव्हाणे म्हणाले.
दरम्यान जिल्हाधिकारी सुनील चव्हाण उद्या रविवारी रुजू झाल्यानंतर सर्व प्रमुख अधिका-यांशी चर्चा करून योग्य निर्णय घेणार असल्याचे त्यांनी कळविले आहे.
औरंगाबाद शहरात कोरोना संसर्ग झपाट्याने वाढत आहे. आतापर्यत १५ दिवसात कोरोना बाधित रुग्णांचा आकडा तीन हजारापेक्षा अधिक झाला आहे. मार्चच्या पहिल्या तारखेला बाधित रुग्ण २९९ होते. २ रोजी ३०७, ३ रोजी ३३९, ४ रोजी ३५१, ५ रोजी ३५३ या प्रमाणे बाधितांचा आकडा वाढतच चालला आहे. कोविड केअर सेंटरसह खासगी रुग्णालये रुग्णांनी भरली आहेत. त्यामुळे रुग्णांसाठी बेडची कमतरता भासत आहे. दिवसेंदिवस पाँझिटिव्हीटी रेट वाढत जात असल्यामूळे प्रशासनाने लाँकडाऊन लावण्याची तयारी सुरू केली असून सोमवारपासून सात दिवसाकरिता लाँकडाऊन होण्याची दाट शक्यता सुत्रांनी व्यक्त केली आहे.