Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारा पोलिसांच्या ताब्यात

Advertisements
Advertisements
Spread the love

औरंंगाबाद : मित्राच्या वाढदिवसाला चल असे म्हणून १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. राजेंद्र पांडूरंग कांबळे (रा.बीड बायपास परिसर) असे अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्याचे नाव असल्याची माहिती पुंडलिकनगर पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी बुधवारी (दि.१०) कळविली.

Advertisements

पीडित १३ वर्षीय अल्पवयीन मुलगी बीड बायपास परिसरात राहणाऱ्या नातेवाईकाकडे वास्तव्यास आहे. ७ फेबु्रवारी रोजी राजेंद्र कांबळे याने पीडितेला माझ्या मित्राच्या वाढदिवसाला चल असे म्हणून सोबत नेले. त्यानंतर पीडितेवर लैंगिक अत्याचार केला होता. दरम्यान, पीडितेच्या नातेवाईकांनी मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात नोंदवली होती. पीडित मुलगी बीड बायपास रोडवर फिरत असतांना पोलिसांना मिळून आल्यावर पोलिसांनी तिला ताब्यात घेवून चौकशी केली असता तीने तिचा मित्र असलेल्या राजेंद्र कांबळे याने लैंगिक अत्याचार केला असल्याची माहिती दिली. याप्रकरणी पीडितेने दिलेल्या तक्रारीवरून राजेंद्र कांबळे याच्याविरूध्द पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisements
Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!