Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraNewsUpdate : मनसैनिकाला १ लाखाची खंडणी घेताना रंगेहात पकडले

Advertisements
Advertisements
Spread the love

तळेगाव ढमढेरे येथील मनसे पदाधिकारी कैलास नरके याला १ लाखाची खंडणी घेताना पोलिसांनी रंगेहाथ पकडले असल्याचे वृत्त आहे. याप्रकरणी मनसे पदाधिकाऱ्यासह चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिंचवड एमआयडीसीमधील  एका कंपनीमुळे प्रदूषण होत असल्याची तक्रार महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाकडे  करण्यात आली होती. ही तक्रार मागे घेण्यासाठी महामंडळाच्या प्रादेशिक अधिकाऱ्याच्या वतीने या मनसे पदाधिकाऱ्याने   संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्याकडे २० लाखांची खंडणी  मागितली होती . त्यातील टोकन  म्हणून १ लाख रुपये स्वीकारताना हि अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

Advertisements

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कैलास नरके (रा. हनुमान नगर,तळेगाव ढमढेरे, ता. शिरूर) असं अटक केलेल्या मनसे पदाधिकाऱ्याचं नाव आहे. तर त्याच्यासह आशिष अरबाळे, पंढरीनाथ साबळे, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ वाकडेवाडी येथील प्रादेशिक अधिकारी डॉ. जितेंद्र संघेवार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत कपील सुभाष पाटील (वय ४२, रा. लोढा बेलमांडो, गहुंजे) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Advertisements
Advertisements

फिर्यादी पाटील हे चिंचवड एमआयडीसीमधील स्टार इंजिनिअर्स इंडिया या कंपनीत सीआयओ पदावर काम करतात तर आरोपी आशिष अरबाळे हा पाटील यांच्या कंपनीत कन्सल्टंट म्हणून काम करतो. आशिष याने पाटील यांच्या स्टार इंजिनिअर्स इंडिया कंपनीची माहिती आरोपी पंढरीनाथ साबळे याला दिली. पंढरीनाथ साबळे याच्या माहितीवरून मनसे पदाधिकारी कैलास नरके याने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या वाकडेवाडी येथील कार्यालयात स्टार इंजिनिअर्स इंडिया या कंपनीच्या विरोधात तक्रार दिली. ही तक्रार मागे घेण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे रिझनल ऑफिसर आरोपी डॉ. जितेंद्र संघेवार याच्या वतीने कैलास याने फिर्यादी पाटील यांच्याकडे २० लाख रुपयांची खंडणी मागितली. त्या खंडणीतील टोकन रक्कम म्हणून एक लाख रुपये देण्याचे ठरलं. त्यानुसार पुणे-नगर रोडवर कल्याणीनगर येथील हयात हॉटेलमध्ये टोकन देण्याचे ठरलं. दरम्यान पाटील यांनी पोलिसांत तक्रार केली. पोलिसांनी मनसे पदाधिकारी कैलास नरके याला एक लाख रुपये रकमेचे पाकीट खंडणी म्हणून घेताना पोलिसांनी रंगहाथ पकडलं. या प्रकरणी पिंपरी पोलीस पुढील तपास करीत आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!