Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CoronaMaharashtraUpdate : राज्यात 5753 नव्या कोरोना बाधीत रुग्णांची वाढ

Advertisements
Advertisements
Spread the love

एकीकडे राज्यात कोरोनमुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असतानाच दिवसेंदिवस कोरोना  बाधित रुग्णांची संख्या वाढली आहे. त्यामुळे नागरिकांनी संसर्ग टाळण्यासाठी अधिक काळजी घेणे गरजेचे ठरले आहे. गेल्या काही दिवसांत दररोज बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या बाधितांपेक्षा अधिक होती.  राज्यात आज ५७५३ करोनाबाधित रुग्णांची वाढ झाली व आज नवीन ४०६० करोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे एकूण १६,५१,०६४ रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली. दरम्यान, राज्यात एकूण ८१,५१२ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ९२.७५ टक्के झाले आहे.

Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!