CoronaMaharashtraUpdate : गेल्या २४ तासात ४२३७ नव्या रुग्णांची नोंद

राज्यात आज 4237 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 2707 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 1612314 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 85503 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 92.41% झाले आहे.#CoronaVirusUpdates
— Rajesh Tope (@rajeshtope11) November 14, 2020
गेल्या २४ तासात राज्यात ४ हजार २३७ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे तर २ हजार ७०७ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. नवीन रुग्णांच्या तुलनेत रोजचा बरे होणाऱ्या रुग्णांचा आकडा अचानक कमी झाल्याने चिंतेत भर पडली आहे. दरम्यान, रिकव्हरी रेटवरही त्याचा परिणाम झाल्याचे दिसत आहे. तर आज १०५ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे.
ऐन दिवाळीत करोनाचे आकडेही काळजीत भर घालणारे ठरत आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आज अचानक खूप खाली आले आहे. राज्यात आज फक्त २ हजार ७०७ रुग्ण बरे होऊन घरी परतले तर त्याचवेळी ४ हजार २३७ नवीन रुग्णांची वाढ झाली आहे. आतापर्यंत एकूण १६ लाख १२ हजार ३१४ करोना बाधित रुग्णांनी करोनाला मात दिली असून राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९२.४१ टक्के एवढे झाले आहे. राज्यात आज १०५ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील करोना मृत्यूदर २.६३ टक्के एवढा आहे. राज्यात करोना संसर्गाने आतापर्यंत ४५ हजार ९१४ जणांचा बळी घेतला आहे. सध्या राज्यात ८५ हजार ५०३ अॅक्टिव्ह रुग्ण असून या रुग्णांवर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. आजचा अपवाद वगळल्यास गेल्या काही दिवसांपासून अॅक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत दररोज खूप मोठी घट होताना दिसले आहे.