Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MarathwadaCrimeUpdate : लिव्ह इन मध्ये राहणाऱ्या प्रेयसीला जिवंत जाळून प्रियकर फरार

Advertisements
Advertisements
Spread the love

लोव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहणाऱ्या  प्रेयसीवर अ‍ॅसिड टाकून आणि पेट्रोल ओतून पेटवून दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून या तरुणीचा मृत्यू झाला झाला असून पोलीस फरार प्रियकराचा शोध घेत आहेत. अर्धवट जळालेल्या अवस्थेत हि तरुणी १२ तास घटनस्थाळावर मदतीसाठी तडफडत होती मात्र तिला जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करूनही ती वाचली नाही. बीड जिल्ह्याच्या  येळंब घाट परिसरात हि धक्कादायक घटना घटना घडली असल्याचे वृत्त आहे.

Advertisements

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सावित्रा दिगंबर अंकुलवार ( वय २२ ) असे या मृत तरुणीचं नाव असून ती नांदेड जिल्ह्यातील देगलुर तालुक्यातील शेळगावातील येथील  रहिवासी आहे. याच गावातील अविनाश राजुरे नावाच्या तरुणासोबत गेल्या काही दिवसांपासून पुण्यात लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होती. दिनांक १३ नोव्हेंबर रोजी रात्री दोघेही पुण्याहुन गावी परतण्यासाठी दुचाकीवरून जात होते. दरम्यान, पहाटे ३ वाजेच्या सुमारास  येळंब (घाट) परिसरात निर्मनुष्य ठिकाणी मांजरसुंबा -केज हा मुख्य रस्त्यावरून जात असताना आरोपी तरुणाने गाडी थांबवली. त्यानंतर या तरुणाने  रस्त्याच्या बाजूला अगोदर तरुणीवर अ‍ॅसिड टाकले आणि तेवढ्यावरच न थांबता काही वेळाने त्याने पेट्रोल टाकून तरुणीला पेटवून दिले. आणि  आरोपी तरुण घटनास्थळावरून फरार झाला. या  घटनेत सावित्रा ४८ टक्के भाजली होती.

Advertisements
Advertisements

पोलिसांनी पुढे सांगितले कि , पहाटे ३ वाजेच्या सुमारास ही घटना  घडल्यानंतर तब्बल १२ तास दुपारी 2 वाजेपर्यंत  ही तरुणी रस्त्याच्या बाजूला असलेल्या एका खड्यात  तडफडत होती. काही वेळानंतर  रस्त्यावर वरून जाणाऱ्यांना आवाज आल्याने खड्यात पहिले असता अर्धवट जळालेल्या तरुणी दिसली. त्यानंतर तातडीने पोलिसांना याबद्दल माहिती देण्यात आली. घटनास्थळी पोलिसांनी पोहोचून पंचनामा केला आणि जखमी तरुणीला स्वत : च्या गाडीतून नेकनूरला नेले तिथून  रुग्णवाहिकेनं बीड जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. तिच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले होते. पण, अ‍ॅसिड हल्ला आणि पेट्रोलने 48 टक्के शरीर भाजल्यामुळे तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी नेकनूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा करण्यात आला असून आरोपीचा शोध सुरू आहे, अशी माहिती उप विभागीय पोलिस अधिकारी भास्कर सावंत यानी दिली.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!