AurangabadCrimeUpdate : परित्यक्तेला ५ लाखांची मागणी, अॅट्राॅसिटीचा गुन्हा दाखल, आरोपी फरार

औरंगाबाद – चार वर्षांपासून अनैतिक संबंध असलेल्या परित्यक्तेला ५ लाख रु.ची मागणी करत तिचे अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देणार्या दोघांविरुध्द सिडको पोलिस ठाण्यात अॅट्राॅसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशोक विधाते रा. हडको, आणि सय्यद शकील रा. नारेगाव अशी आरोपींची नावे आहेत. वरील पैकी अशोक विधातेने गुन्हा केल्यानंतर पिडीतेला ब्लॅकमेल करण्याच्या उद्देशाने ५लाख रुपयांची मागणी केली. पिडीतेने घाबरुन कुटुंबियांच्या मदतीने धाव घेत सिडको पोलिस ठाण्यात अॅट्राॅसिटीचा गुन्हा दाखल करण्यासाठी तक्रार देताच गुन्हा दाखल झाला पुढील तपास सहाय्यक पोलिस आयुक्त निशीकांत भुजबळ करंत आहेत.
मॉन्टीसिंगचा खून करणा-याची रवानगी हर्सूल कारागृहात
औरंंंगाबाद : प्रेयसीच्या वादातून मंन्टुश कुमार सिंग उर्फ मॉन्टीसिंग याची चाकूने भोसकून हत्या करणा-या कपील रापते उर्फ राजे याची पोलिस कोठडीची मुदत संपल्यावर न्यायालयासमोर हजर करण्यात आले. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए.जे.पाटील यांनी कपील रापते उर्फ राजे याची हर्सूल कारागृहात रवानगी करण्याचे आदेश मंगळवारी (दि.३) दिले.
मिटमिटा परिसरातील पिस सोसायटीत राहणा-या मंन्टुश कुमार सिंग उर्पâ मॉन्टीसिंग याची प्रेयसीच्या वादातून हत्या करण्यात आल्याची घटना गेल्या महिन्यात उघडकीस आली होती. या प्रकरणी छावणी पोलिसांनी गुन्हा दाखल झाल्यावर कपील रापते याला पुणे येथून अटक करून शहरात आणले होते. तेंव्हापासून कपील रापते हा पोलिस कोठडीत होता. कपील रापते याच्या पोलिस कोठडीची मुदत संपल्यावर त्याला मंगळवारी न्यायालयासमोर हजर केले असता, प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए.जे.पाटील यांनी रापते याची हर्सूल कारागृहात रवानगी करण्याचे आदेश दिले. आरोपी कपील रापते याच्या वतीने अॅड. श्रीनिवास तलवार यांनी न्यायालयात बाजू मांडली.
मंगळसूत्र चोरट्यास शुक्रवारपर्यंत पोलिस कोठडी
औरंंंगाबाद : उस्मानपुरा परिसरातून पायी जात असलेल्या महिलेचे मंगळसूत्र हिसकावून पोबारा करणा-या विक्की उर्फ हेल्मेट गौतम सोनकांबळे याला शुक्रवारपर्यंत (दि.६) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी धनश्री भंडारी यांनी मंगळवारी (दि.३) दिले. विनीता हिरालाल चव्हाण (रा.उस्मानपुरा परिसर) या २० ऑक्टोबर रोजी उस्मानपुरा परिसरातून पायी जात असतांना दुचाकीवर आलेल्या विक्की उर्पâ हेल्मेट सोनकांबळे याने त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून पोबारा केला होता. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यावर उस्मानपुरा पोलिसांनी विक्की उर्पâ हेल्मेट सोनकांबळे याला अटक केली. सहाय्यक सरकारी वकील जयमाला राठोड यांनी न्यायालयात सरकारपक्षाच्या वतीने बाजू मांडली.
मोबाईल चोरट्यास ५ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी
औरंंंगाबाद : हर्सूल परिसरातील जाधववाडी भाजी मंडईतून मोबाईल व रोख रक्कम असा एकूण १४ हजार ५०० रूपये किमतीचा ऐवज चोरणा-या आकाश चंद्रकांत त्रिभूवन (वय १९, रा.हर्षनगर) याला सिडको पोलिसांनी जेरबंद केले. आकाश त्रिभूवन याला मंगळवारी (दि.३) न्यायालयासमोर हजर केले असता प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस.यु.न्याहारकर यांनी ५ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
भोईवाडा परिसरातील कोहीनुर कॉलनी येथील रहिवासी शेख रहिम शेख सादीक हे जाधववाडी भाजीमंडईत भाजीपाला खरेदी करीत असतांना आकाश त्रिभूवन याने त्यांच्या खिशातून शिताफीने मोबाईल व रोख रक्कम असा एकूण १४ हजार ५०० रूपये किमतीचा ऐवज चोरला होता. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यावर सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यावर पोलिसांनी आकाश त्रिभूवन याला अटक केली. सहाय्यक सरकारी वकील सय्यद शहनाज यांनी सरकार पक्षाच्या वतीने न्यायालयात बाजू मांडली.