AurangabadNewsUpdate : सावधान , औरंगाबाद शहरात २४ तास कार्यरत आहे आयुक्तांचे विशेष पथक

औरंगाबाद : शहरातील पोलिस ठाणे आणि गुन्हेशाखा आपापल्या क्षमतेनुसार काम करतात तसेच विशेष पथकही आपल्या पध्दतीने काम करते. त्यामुळे कोणी निष्र्कीय आहे असे म्हणणे योग्य ठरणार नाही.असे स्पष्टीकरण पोलिसआयुक्त डाॅ.निखील गुप्ता यांनी दिले.परंतु विशेष पोलीस आयुक्तांच्या थेट देखरेखीखाली विशेष पथक २४ तास कार्यरत आहे आणि त्याची नजर गुन्हेगारांबरोबर पोलीस कर्मचाऱ्यांवरही आहे.
डाॅ.गुप्ता यांनी शहराचा पदभारस्वीकारल्यानंतर कोणाच्याही भरवश्यावर न राहता विशेष पथकाची स्थापना केली.या बाबत त्यांना विचारले असता ते म्हणाले की, तत्कालिन पोलिसआयुक्त अमितेशकुमार यांनी ज्या प्रमाणे चार्ली पथकाची स्थापना केली होती. ते पथक १२० अधिकारी आणि कर्मचार्यांचे होते. व ते थेट पोलिसआयुक्तांच्याच संपर्कात असायचे. तशीच विशेष पथकाची स्थापना आहे. या पथकाच्या स्थापनेनंतर शहरातील गुन्हेगारीचे नेमके स्वरुप लक्षात येऊन काम करण्यास योग्य दिशा मिळंत असल्याचे ते म्हणाले.या पूर्वी यशस्वी यादव आणि चिरंजीवप्रसाद पोलिसआयुक्त असतांना असणारी शहराची स्थिती आणि आता बदलत असणारी स्थिती यामधे बदल घडून येत असल्याचे बहुतेक पोलिस अधिकारी दबक्या आवाजात बोलतात असे चित्र वेळोवेळी दिसून येते.त्यामुळे पोलिस ठाणे किंवा गुन्हेशाखा कारवाई करतांना अंदाज घेतात की आयुक्तांचे पथक आपण करत असलेल्या कारवाई बाबत माहिती ठेवून आहे की नाही.अशी माहितीही वरिष्ठ सुत्रांनी दिली.