Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadCrimeUpdate : डिझेल आणि पेट्रोल चोरणारी टोळी अटकेत,४० लाखांचा मुद्देमाल जप्त , विशेष पथकाची कारवाई

Advertisements
Advertisements
Spread the love

औरंगाबाद – वैजापूर रोडवरील जांभाळा शिवारात संध्याकाळी ६च्या सुमारास हिंदुस्तान पेट्रोलियमच्या टॅंकरमधून ५हजार लिटर डिझेल चोरतांना सहा जणांच्या टोळक्याला पोलिसआयुक्तांच्या विशेष पथकाने अटक करुन दौलताबाद पोलिसांकडे सूपूर्द केले.
शेख अब्दुला शेख अहेमद(४५) रा.लिपाणी अडगाव,साजेदखान साहेबखान(३०) रा.कैसर काॅलनी,शेख जाहेद शेख हमीद(२६) रा.बायजीपुरा गल्ली नं ८,मुक्तार वजीर शेख(४०)रा. बालानगर पैठण,अश्पाक हुसेन(४०) रा.सिटीचौक, इलियासखान आजमखान(५४) रा. जिन्सी अशी अटक आरोपींची नावे आहेत.त्यांच्या ताब्यातून मोबाईल, रोख रक्कम, चारचाकी वाहने, गॅलन असा ४०लाख ११हजार रु.चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईत एपीआय राहूल रोडे, पोलिस कर्मचारी अनिल खरात, मनोज विखनकर,विठ्ठल आडे, विजय निकम, इम्रान पठाण, सय्यद शकील, विनोद पवार यांनी सहभाग घेतला होता.

Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!