AurangabadNewsUpdate : धक्कदायक : ड्युटीवर जाणाऱ्या महिला डाॅक्टरच्या अपहरणाचा प्रयत्न, गुन्हा दाखल

औरंगाबाद – घाटी रुग्णालयात नौकरी करंत असलेल्या महिला डाॅक्टर चे गुरुवारी मध्यरात्री दोघांनी चाकुचा धाक दाखवून अपहरण करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी आज ३आॅक्टोबर रोजी बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. औरंगाबाद शहरात अशा प्रकारची घटना घडणे धक्कादायक आहे.
पिडीत महिला डाॅक्टर गुरुवारी मध्यरात्री नाईट शिफ्ट असल्यामुळे सुपर स्पेशालिटी विभागाकडे पायी जातांना अंदाजे २७ ते ३०वर्षाच्या दोघांनी पाठीमागून येत चाकूचा धाक दाखवून महिला डाॅक्टरला पळवून नेण्याचा प्रयत्न केला. पण समोरुन अॅम्ब्यूलंन्स येत असल्याचा आवाज येताच त्या आरोपींनी महिला डाॅक्टरला झुडपात फेकून दिले व पळून गेले. हा प्रकार घाटीच्या अधिष्ठाता डाॅ.कानन येळीकर यांना कळल्यानंतर पिडीत महिला डाॅक्टरने बेगमपुरा पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल झाला. पुढील तपास पोलिस निरीक्षक सचिन सानप यांच्या मार्गदर्शनाखाली बेगमपुरा पोलिस करंत आहेत