Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

HathrasGangRapeAndMurder : पोलिसांशी वादविवाद करीत अखेर प्रियांका आणि राहुल गांधी पीडितेच्या कुटुंबियांना भेटले…

Spread the love

अन्याविरोधात लढाई सुरूच राहील. जोपर्यंत न्याय होत नाही तोपर्यंत कुणीही आम्हाला रोखू शकत नाही अशी प्रतिक्रिया हाथरस येथील पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी व प्रियंका गांधी यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. काँग्रेस पीडित कुटुंबाच्या पाठीशी असल्याचे त्यांनी सांगितले. राहुल गांधी व प्रियंका गांधी पीडित कुटुंबाच्या घरातून बाहेर पडताच, माध्यमांनी त्यांना घेरले. माध्यमांशी बोलताना त्यांनी म्हटले कि , पीडित कुटुंबाचा आवाज कुणीही दाबू शकत नाही .  त्या कुटुंबाने आपल्या मुलीला शेवटचं पाहिलं देखील नाही. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जबाबदारी समजली पाहिजे. असं प्रियंका गांधी यांनी यावेळी म्हटलं आहे.

हाथरस येथील पीडितेच्या कुटुंबियांना निघालेले राहुल गांधी यांना १ ऑक्टोबरला पोलिसांनी नोयडा येथे अडवून त्यांचा रास्ता रोखला होता . यावेळी त्यांना धक्का बुक्कीही झाली . दरम्यान या घटनेचे पडसाद संपूर्ण देशभरात उमटले होते . भाजपच्या नेत्यांनीही योगी यांच्या सरकारने पीडितेच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी जाणाऱ्या कुठल्याही नेत्यांना  किंवा माध्यमांना अडवू नये अशा सूचना केल्या होत्या . त्या उपरांत काल माध्यमांच्या प्रतिनिधींनाही पोलिसांनी हाथरस  येथेच रोखून धरले होते . दरम्यान आज मात्र काँग्रेसचे खासदार राहुल गांधी आणि पक्षाच्या महासचिव प्रियांका गांधी वाड्रा यांच्यासह पाच व्यक्तींना राज्य सरकारने पीडितेच्या कुटुंबियांना भेटण्याची परवानगी दिली त्यानुसार शनिवारी सायंकाळी ७.२५ मिनिटांच्या दरम्यान उत्तर प्रदेशातल्या हाथरसमध्ये दाखल झाले. कथित सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडित मुलीच्या घरी दाखल होत राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनी पीडित कुटुंबीयांची भेट घेतली. त्यांच्यासोबत के सी वेणुगोपाळही  उपस्थित होते. एका बंद खोलीत राहुल – प्रियांका यांनी पीडित कुटुंबीयांशी बातचीत करताना त्यांचं दु:ख जाणून घेतलं. यावेळी प्रियांका यांनी पीडितेच्या आईला घट्ट मिठी मारत त्यांना न्याय मिळवून देण्याचा निर्धार व्यक्त केला.

‘या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी व्हावी, तसंच कुटुंबाला धमकी देणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांना निलंबित करण्यात यावं अशी पीडित कुटुंबीयांची इच्छा आहे. कुटुंबाला त्यांच्या मुलीला अखेरचं पाहताही आलं नाही. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव असायला हवी. पीडित कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत आमचा लढा सुरूच राहणार’ अशी प्रतिक्रिया प्रियांका गांधी यांनी पीडित कुटुंबीयांची भेट घेतल्यानंत मीडियाशी बोलताना व्यक्त केली. या दरम्यान, ‘आम्ही सध्या सुरू असलेल्या चौकशीनं संतुष्ट नाही. कारण आम्हाला अद्याप प्रश्नांची उत्तरं मिळालेली नाहीत. ज्या जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी कुटुंबाला खुलेआम धमकी दिली त्यांनाही अद्याप निलंबित करण्यात आलेलं नाही’ अशी प्रतिक्रिया पीडितेच्या भावानं मीडियासमोर व्यक्त केली.

काँग्रेस नेत्यांची पोलिसांकडून अडवणूक आणि प्रियांकाची मध्यस्थी…

या दरम्यान लखनऊमध्ये पोलिसांनी उत्तर प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अजय लल्लू यांना त्यांच्या घरातच कैद करून ठेवलंय. शनिवारी दिल्लीहून हाथरसकडे निघालेल्या राहुल – प्रियांका गांधी यांना दिल्ली-नोएडा डायरेक्ट फ्लायओव्हर (डीएनडी) वर अडवण्यात आलं. काँग्रेस कार्यकर्ते आणि पोलीस यांच्यात बाचाबाची आणि लाठीचार्जाचा प्रकार घडल्यानंतर प्रियांका – राहुल गांधी यांच्यासहीत केवळ पाच जणांना हाथरसकडे जाण्यासाठी परवानगी देण्यात आली. त्यामुळे काँग्रेसच्या अन्य नेत्यांसोबत मल्लिकार्जुन खडगे आणि रणदीप सुरजेवाला यांना माघारी फिरावं लागलं. प्रियांका आणि राहुल गांधी यांच्यासोबत काँग्रेस नेते पी एल पुनिया, गुलाम नबी आझाद, प्रमोद तिवारी हे देखील हाथरसमध्ये पोहचले . या दरम्यान, हाथरसमध्ये मोठ्या संख्येनं मीडिया कर्मचारी आणि पत्रकारांची मोठी गर्दी होती.  नोयडा फ्लॅओव्हर जवळ जवळपास २००० हून अधिक काँग्रेस कार्यकर्ते एकत्र झाले होते . यावेळी कार्यकर्त्याना मज्जाव करताना पोलिसांनी सौम्य लाठीमारही केला परंतु स्वतः प्रियांका गांधी पोलीस आणि कार्यकर्त्यांच्या मध्ये पडल्याने जास्तीचे काही घडले नाही. रस्त्यावर ठीक ऱ्हिकानी मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!