Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : Babri Demolition Case : निकालावर प्रतिक्रिया देताना रथ यात्रेचे प्रणेते म्हणाले ” जय श्रीराम !! “

Advertisements
Advertisements
Spread the love

संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या बाबरी मशीद विध्वंस प्रकरणी  बुधवारी सीबीआयच्या विशेष न्यायालयाने सर्व आरोपींना निर्दोष मुक्त केल्यानंतर सर्व हयात आरोपींनी आनंद व्यक्त केला आहे . या प्रकरणातील आरोपी लालकृष्ण आडवाणी, उमा भारती, मुरली मनोहर जोशी यांच्यासह सर्व ३२आरोपी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. बाबरी मशीद विध्वंस पूर्वनियोजित कट नव्हता, असा निर्वाळा लखनौ कोर्टाने दिला आहे. या प्रकरणात साक्षीदार प्रबळ नव्हते असे कोर्टाने म्हटलं आहे. कोर्टाचा हा निकाल आल्यानंतर या प्रकरणातील आरोपी आणि भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांनी आनंद व्यक्त केला आहे. आजचा हा निकाल अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. ‘जय श्रीराम’ अशी घोषणा देत आम्ही निकालाचं स्वागत केलं. निकालामुळे आम्ही अत्यंत आनंदी झालो आहोत, अशी प्रतिक्रिया लालकृष्ण आडवाणी यांनी दिली आहे. दरम्यान,६ डिसेंबर १९९२ रोजी मशीद पाडल्याबद्दल भाजप, आरएसएस, विहिंप नेते आणि कारसेवक यांच्यावरील फौजदारी खटल्याच्या या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागून होते.

Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!