CoronaAurangabadUpdate : केवळ ३ रुग्णांची वाढ, जिल्ह्यात 3915 रुग्णांवर उपचार सुरु

UPDATE : 4:10 PM
जिल्ह्यातील तीन रुग्णांचे अहवाल दुपारी पॉझिटिव्ह आले. त्यामुळे आतापर्यंत 13322 कोरोनाबाधित आढळले आहेत. त्यापैकी 8953 बरे झाले, 454 जणांचा मृत्यू झाला. तर 3915 जणांवर उपचार सुरु आहेत. रुग्णांचा जिल्ह्यातील भागांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या)
मनपा (2)
राम नगर, एन दोन, सिडको (1) छावणी परिसर (1)
ग्रामीण (1)
रचना कॉलनी, वैजापूर (1)
पाच कोरोनाबाधितांचा मृत्यू
घाटीत आंबेडकर नगरातील 31 वर्षीय पुरुष, रोजाबाग येथील 65 वर्षीय स्त्री, आडगाव, कन्नड येथील 60 वर्षीय पुरुष आणि खासगी रुग्णालयांत विद्यानगरातील 35 वर्षीय स्त्री, राम नगरातील 68 वर्षीय पुरुष, कोरोनाबाधितांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला.
00000