AurangabadNewsUpdate : जिल्ह्यात 982 रुग्णांवर उपचार सुरू, दुपारी 13 रुग्णांची वाढ

औरंगाबाद जिल्ह्यात आज दुपारी 13 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्याने एकूण कोरोनाबाधितांची संख्या 2420 झाली आहे. यापैकी 1317 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून 121 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने आता 982 रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे प्रशासनाने कळविले आहे.
जिल्ह्यात आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे. वेदांत नगर (1) एसआरपीएफ परिसर (2) जिल्हा परिषद परिसर (1), इटखेडा (1), बजाज नगर (1), साईनगर, पंढरपूर (1), उत्तम नगर, जवाहर कॉलनी (1), संजय नगर, बायजीपुरा (2), शहागंज (1), जटवाडा रोड (1), अन्य (1) या भागातील कोरोनाबाधित आहेत. यामध्ये 10 पुरूष आणि 03 महिला रुग्णांचा समावेश आहे.