Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

ह्रदयद्रावक : दोन मुलांसह विवाहितेची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या….

Spread the love

जालना जिल्ह्यातील जाफ्राबाद तालुक्यातील देडेगव्हाण येथील एका विवाहितेने आपल्या पोटच्या दोन मुलांसह  विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची ह्रदयद्रावक घटना घडल्याचे  उघडकीस आले. रुख्मिणीबाई बनकर (27) असे  या विवाहितेचे  नाव असून तिने आपली  ७ वर्षीय मुलगी प्रणिता आणि एक वर्षाचा मुलगा शंभू या दोन मुलांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर विवाहिता रात्री उशिरा आपल्या दोन्ही मुलांसह  घरातून निघून गेली होती. त्यानंतर कुटुंबीयांनी परिसरात शोधाशोध केली, मात्र ते कुठेही आढळून आले नाहीत. अखेर सकाळी गावातील एका विहिरीत तिघांचे प्रेत आढळून आले. दरम्यान, अग्निशमन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून मृतदेह बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरू आहे. महिलेनं आपल्या मुलांसह आत्महत्या का केली, यामागचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. मात्र कौटुंबिक कलहातून ही घटना घडल्याची प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. या घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!