#CoronaLatestUpdate : औरंगाबाद जिल्ह्यात 835 कोरोनाबाधित, आणखी 6 रुग्ण आढळले, देशातील रुग्णांची संख्या 81 हजाराहून अधिक

औरंगाबाद : औरंगाबाद शहरात आणखी सहा रुग्णांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 835 झाली असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. औरंगाबाद शहरातील आज आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे. जुना मोंढा, भवानी नगर (1), रेहमानिया कॉलनी (2), बायजीपुरा (2), हुसेन कॉलनी (1) या भागातील रुग्णांचा समावेश आहे.
दुनिया : एकूण रुग्णसंख्या : 4,545,185 । उपचारानंतर घरी गेलेले रुग्ण 17, 15, 926 | एकूण मृत्यू 3, 03, 855
जगभरात थैमान घातलेल्या करोनाच्या संसर्गाने तीन लाख नागरिकांचे प्राण घेतले आहेत. तर, ४५ लाखांहून अधिकजणांना करोनाची बाधा झाली असल्याचे वृत्त रॉयटर या वृत्तसंस्थेने दिले आहे. यात करोनाच्या संसर्गामुळे प्राण गमावलेल्यांची निम्मी संख्या ही अमेरिका, ब्रिटन आणि इटली या देशांतील नागरिकांची आहे.
करोनाच्या संसर्गामुळे चीनमधीन वुहान येथे १० जानेवारी रोजी पहिला बळी गेला असल्याची नोंद करण्यात आली. त्यानंतर ९१ दिवसांमध्ये एक लाख जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. त्यानंतर १६ दिवसांमध्ये मृतांचा आकडा दोन लाखांपर्यंत पोहचला. दोन लाख ते तीन लाख नागरिकांचा मृत्यू हा १९ दिवसांत झाला असल्याचे ‘रायटर’ने म्हटले आहे. मलेरियाच्या आजाराने जगभरात दरवर्षी चार लाख नागरिकांचा मृत्यू होतो. त्यातुलनेत करोनाच्या आजाराने मृत्यू पावणाऱ्यांची संख्या अधिक आहे. करोनाच्या आजाराने तीन लाख नागरिकांचा मृत्यू झाला असताना जवळपास १७ लाख नागरिकांनी आजारावर मात केली आहे.
अमेरिकेत करोनाच्या संसर्गमुळे ८५ हजारजणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तर, ब्रिटनमध्ये ३० हजारांहून अधिकजणांना प्राण गमवावे लागले आहे. इटलीमध्ये ३१ हजार नागरिकांना प्राण गमवावे लागले आहेत. त्याशिवाय फ्रान्स, स्पेनमध्ये २७ हजार, ब्राझीलमध्ये १३ हजार नागरिकांचा मृत्यू करोनाच्या आजाराने झाला आहे.