Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CoronaVirusLatestUpdate : जास्तीत जास्त करोनाबाधित निष्पन्न होणे चांगली घटना -डाॅ कुलकर्णी , औरंगाबाद जिल्ह्यात पुन्हा 6 रुग्णांची वाढ , कोरोनाबाधितांची एकूण रुग्णसंख्या 829 वर….

Spread the love

औरंगाबाद शहरात आणखी सहा रुग्णांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 829 झाली असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे.
औरंगाबाद शहरातील आज आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे. सिल्क मिल कॉलनी (1), चाऊस कॉलनी (2) आणि हुसेन कॉलनी (3) या भागातील रुगांचा समावेश आहे.


जास्तीत जास्त करोनाबाधित निष्पन्न होणे चांगली घटना -डाॅ कुलकर्णी

शहरातील वाढत्या  रुग्णसंख्येबाबत निश्चित होऊन आपली सकारात्मक प्रतिक्रिया देताना जिल्हा शल्य चिकित्सक सुंदर कुलकर्णी म्हणाले कि , जास्तीत जास्त कोरोनाबाधित रुग्ण निष्पन्न होणे म्हणजे फायदे  आहेत. जास्त ट्रेस झाले म्हणजे कोरोनाबाधितांवर त्वरित उपचार होऊन निरोगी केले जातात.यामुळे शहरातील कोरोना बाधितांचा लवकर निपटारा होईल.त्यांना डिस्चार्ज देता येतील असा विश्र्वासही   डाॅ. कुलकर्णी यांनी महानायकशी बोलतांना व्यक्त केला.

पुढे बोलताना ते म्हणाले कि , कोरोनाचे लक्षण येणाच्या दोन दिवस आधि व लक्षणे आढळल्यानंतर सात दिवस तो पेशंट कोरोना बाधित असतो. तो जर शिंकला तर आणखी रुग्ण वाढवू  शकतो. अशा रुग्णांना ट्रेस करुन उपचार न केल्यास तो घरातल्या लोकांना बाधित करु शकतो.सध्या शहरात अशी परिस्थिती आहे की, ९०टक्के घरात लोक विविध आजाराने त्रस्त असतात असे  लोक लवकर कोरोना बाधित होऊन दगावू शकतात.कारण हे  रोगी मृत्यूच्या उंबरठ्यावर असतात अशा लोकांच्या कुटुंबातील सदस्यही त्यांच्या आजार पणाला वैतागलेले असतात.

दुसर्‍या एका प्रश्नाच्या उत्तरात डाॅ.कुलकर्णी म्हणाले की , मालेगावात बंदोबस्तासाठी गेलेली एस.आर.पी.एफ. जवानांची तुकडी ८० टक्के कोरोना बाधित होते. यातून कोरोनाच्या भयानकतेचा अंदाज येतो.या सर्व पार्श्र्वभूमीवर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या सोबंत झालेल्या बैठकीत एक नवी संकल्पना समोर आली की, रिव्हर्स क्वारंटाईन ही संकल्पना गोवा सरकारने राबवली व ते कोरोना मुक्त झाले.असे  डाॅ.कुलकर्णी म्हणाले.
रिव्हर्स क्वारंटाईन या प्रक्रियेत आशा वर्कर्स शहरातील घरोघरी पाठवून त्या घरात वय वर्षे ५० पेक्षा अधिक वय व विविध रोगांनी ग्रस्त असलेल्या नागरिकांना वेगले  काढून त्यांच्यावर उपचार करायचे म्हणजे नवे कोरोना बाधित आपोआप कमी निष्पन्न होतात. ही संकल्पना गोवा राज्याने प्रभावी पणे राबवली व त्यात ते कोरोना मुक्त होण्यास यशस्वी झाले.आपल्या शहरातील सध्याच्या काळातील २० मृत्यू अशाच प्रकारे झाल्याची माहिती हाती आली आहे. कारण हे मयत कोरोनापूर्वी कुठल्यातरी रोगाने बाधित होते असेही शेवटी डाॅ.कुलकर्णी म्हणाले

आपलं सरकार

Click to listen highlighted text!