Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

#AuangabadNewsUpdate : जुना मोंढा परिसरात असलेल्या तेलाच्या दुकानाला आग , लाखो रुपयांचे नुकसान

Advertisements
Advertisements
Spread the love

औरंंंगाबाद : जुना मोंढा परिसरात असलेल्या बजरंग तेल भांडार या तेलाच्या दुकानाला मंगळवारी (दि.५) रात्री आठ वाजेच्या सुमारास अचानकपणे आग लागली. या आगीत दुकानातील लाखो रूपये किमतीचे तेलाचे डबे, गोडेतेल आदी जळून खाक झाले असल्याची माहिती अग्निशमन दलाच्या सुत्रांनी दिली.
जुना मोंढा परिसरातील जाफरगेट जवळ असलेल्या बजरंग तेल भांडारला  मंगळवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास अचानकपणे आग लागली. आगीने पाहता पाहता रौद्ररूप धारण करीत तेलाच्या दुकानाला आगीच्या कवेत घेतले होते. आगीचे लोळ दुरवरूनच दिसत होते. या घटनेची माहिती मिळताच क्रांतीचौक पोलिसांसह अग्निशमन दलाच्या सहा बंबांनी घटनास्थळी धाव घेतली. तेलाच्या दुकानाला आग लागल्याने आगीचे लोळ उठत होते. अग्निशमन दलाचे कर्मचारी रात्री उशिरापर्यं आग विझविण्यासाठी प्रयत्न करीत होते.

Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!