Aurangabad News Update : केंद्र शासनाची “ती ” सवलत औरंगाबादेतील व्यापाऱ्यांना लागू नाही : पोलीस आयुक्त

केंद्र सरकारने देशातील व्यवसाय दुकाने उघडण्याची परवानगी देणारा आदेश जारी केला असला तरी औरंगाबाद शहर हे “रेड झोन” “हॉटस्पॉट “मध्ये असल्याने शहरात कोरोनाव्हायरस प्रादुर्भाव वाढू नये या उद्देशाने अत्यावश्यक जीवनावश्यक वस्तू प्रतिष्ठाने व आवश्यक उद्योग या सेवेच्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही प्रतिष्ठानाना परवानगी देता येणार नाही.
दरम्यान औरंगाबाद व्यापारी महासंघाचे अध्यक्ष जगन्नाथ काळे आणि सचिव लक्ष्मण नारायण राठी हे इलेक्ट्रॉनिक व इतर प्रतिष्ठाने उघडण्याचे निवेदन घेऊन पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांना भेटले होते परंतु अशा प्रकारची कोणतीही परवानगी औरंगाबाद शहराच्या हद्दीत देण्यात येणार नसल्याचे पोलीस आयुक्तांनी कळवले आहे. शहरातील व्यापाऱ्यांनी याची नोंद घ्यावी आणि यापूर्वीच दिलेल्या आदेशाचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर नागनाथ कोडे यांनी केले आहे.