एपीआय राहूल खटावकर इ-रक्षा अॅवाॅर्ड ने सन्मानित, अमित शहांच्या हस्ते मिळणार पुरस्कार

औरंगाबाद -राष्र्टीय गुन्हे अभिलेख केंद्रातर्फे राष्र्टीय पातळीवर सायबर तपासा संदर्भात आयोजित केलेल्या हॅथकाॅन नावाच्या स्पर्धेत सहाय्यक पोलिस निरीक्षक राहूल खटावकर यांना तृतीय पारितोषिक मिळाले.या स्पर्धेचे पारितोषिक केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते येत्या १२मार्च रोजी दिल्लीमधे वितरित करण्यात येणार आहे.असे गृहमंत्रालयाकडून प्रसिध्द झालेल्या पत्रकात म्हटले आहे.
एपीआय खटावकर यांनी राष्र्टीय अभिलेख केंद्राने घेतलेल्या स्पर्धेमधे इ-रक्षा हे अधुनिक तंत्रज्ञान वापरुन तीन खुनांचे तपास जलद गतीने उलगडले.या प्रकाराला जीआॅग्राफीकल इर्न्फमेशन सिस्टीम असे म्हणतात.
वर्धन घोडे खून प्रकरण, अमोल घुगे खून प्रकरण आणि श्रीकांत शिंदे खून प्रकरणात जीआॅग्राफीकल इर्न्फमेशन सिस्टीम या तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे आरोपी लवकर पकडले गेले. ज्या पध्दतीने हे तंत्रज्ञान खटावकर यांनी वापरले याची नोंद केंद्रीय गृहमंत्रालयाने घेतली आहे. १जानेवारी २०२०रोजी राष्र्टीय गुन्हे अभिलेख केंद्राने मेल द्वारे देशभरातून हॅथकाॅन स्पर्धेसाठी प्रवेश अर्ज मागवले होते. हॅथकाॅन ही एक पात्रता आहे.या मधे सायबर सुरक्षा क्षेत्रात कुशल असलेली व्यक्ती, आय टी चे विद्यार्थी भाग घेतात हॅकर वन पासून हॅथकाॅन या शब्दाची निर्मीती झालेली आहे. ४मार्च ला या स्पर्धेचे देशभरात आयोजन करण्यात आले होते. व दोन दिवसांनी आज ६ मार्च ला या स्पर्धेचा निकाल केंद्राने जाहिर केला.या मधे खटावकरांनी जीआयएस. प्रणालीचा तपासा दरम्यान केलेला वापर उल्लेखनिय ठरला.आयडिया कंपनीच्या डिव्हाईस मधे इ -रक्षा अॅप इन बिल्ट असते.या स्पर्धेत औरंगाबाद पोलिस आयुक्तालयाने तृतीय क्रमांक पटकवल्यामुळे पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी एपीआय खटावकर यांचे कौतूक केले.