Aurangabad Crime : मुलीला कपडे बदलताना पहिले आणि मग “त्याने ” केला हा प्रकार…

Advertisements
Advertisements
Spread the love

औरंगाबाद : घराशेजारी राहणा-या मुलीला कपडे बदलताना पाहिल्यावरुन वाद झाल्यानंतर माथेफिरु तरुणाने पहाटे तीनच्या सुमारास अख्खे घर पेटवून दिले. हा खळबळजनक प्रकार मुकुंदवाडीतील संजयनगरात घडला. एक दिवस अगोदर झालेल्या भांडणातून शेजारी आनंद निकाळजे याने घर पेटविल्याचा संशय कुटुंबाने व्यक्त केला आहे. दरम्यान, आज सकाळी मुकुंदवाडी पोलीसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला.
जालन्यातील नातेवाईकाच्या अंत्यसंस्कारासाठी संजयनगरातील कुटुंब गेले होते. १५ फेब्रुवारी रोजी रात्री दहाच्या सुमारास कुटुंब घरी परतल्यानंतर त्यांची मुलगी कपडे बदलत होती. तिला कपडे बदलताना शेजारी राहणारा आनंद निकाळजे पाहत होता. त्यावरुन त्या कुटुंबात आणि निकाळजेमध्ये वाद झाला. हा वाद वाढू नये यासाठी जावयाने या घरातील कुटुंबियांना त्याच्या बहिणीकडे राहायला पाठवले. त्यानंतर १६ फेब्रुवारीला पहाटे तीनच्या सुमारास घराला अचानक आग लागली. हा प्रकार पाहून घरमालकाने कुटुंबियांशी संपर्क साधला. तसेच घटनेची माहिती मुकुंदवाडी पोलीसांना कळविण्यात आली. त्यानंतर कुटुंबियांनी घराच्या दिशेने धाव घेतली. पण तोपर्यंत घरगुती साहित्य व कपाटातील दिड लाखांची रोकड (दोन हजारांच्या ७५ नोटा) जळून खाक झाली होती. याप्रकारानंतर कुटुंबियांच्या तक्रारीवरुन मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात संशयित निकाळजेविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणाचा पुढील तपास उपनिरीक्षक दादाराव कोपनर करत आहेत.
……
घटनास्थळाचा पंचनामा
निकाळजेवर कुटुंबियांनी संशय व्यक्त केला आहे. त्याने एक दिवस अगोदर झालेल्या वादातून घर पेटविल्याचे म्हटले आहे. दरम्यान, आज सकाळी मुकुंदवाडी पोलीसांनी घटनास्थळाची पाहणी करुन पंचनामा केला. यावेळी निरीक्षक उध्दव जाधव, उपनिरीक्षक कोपनर व कर्मचा-यांची उपस्थिती होती. दरम्यान, निकाळजे हा पसार झाल्याचे पोलीसांनी सांगितले.

Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!