पोलिस आयुक्तालयात खांदेपालट, गुन्हेशाखा निरीक्षक अनिल गायकवाड

औरंगाबाद – कार्यकाल पूर्ण झालेल्या अधिकार्यांचे पोलिसआयुक्तांनी खांदेपालट केले असून गुन्हेशाखा पोलिस निरीक्षक अनिल गायकवाड यांना नियुक्त करण्यात आले आहे. तर पोलिस निरीक्षक मधुकर सावंत यांना वाळूज औद्योगिक पोलिस ठाण्याचे निरीक्षक म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे.
सातारा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक म्हणून सिडको औद्योगिक पोलिस ठाण्याचे सुरेंद्र माळाळे यांना नियुक्त केले असून त्यांच्या जागी आर्थिक गुन्हेशाखेचे पोलिस निरीक्षक श्रीकांत नवले यांना नियुक्त केले आहे. पोलिस निरीक्षक विठ्ठल पोटे यांची सातारा पोलिस ठिण्यातून शहर वाहतूक विभाग पोलिस निरीक्षक म्हणून नेमण्यात आले आहे. तर शहर वाहतूक विभागाचे पोलिस निरीक्षक दादाराव शिनगारे यांना आर्थिक गुन्हेशाखेचे निरीक्षक म्हणून नियुक्ती देण्यात आल्याचे पोलिस आयुक्तांनी सांगितले.