औरंगाबाद कारागृहात रंगली कवयित्री ज्योती सोनवणे व सिमा लोखंडे यांच्या उपस्थितीत कवितेची शाळा

औरंगाबाद मध्यवर्ती कारागृहात बंदिवासात असलेल्या कैदयांना कविता सादरीकरणासाठी व्यासपीठ मिळावे. या भूमिकेतून संकल्पनेतून कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी औरंगाबादच्या प्रसिद्ध कवयित्री ज्योती सोनवणे व सिमा लोखंडे यांची प्रमुख पाहुणे म्हणून विशेष उपस्थिती होती.
ज्योती सोनवणे यांनी विषयांना स्पर्श करणाऱ्या विविध कविता सादर करून उपस्थितांची दाद मिळवली.आपल्या मार्गदर्शनपर भाषणात त्यांनी काव्यलेखनाची भुमिका विषद केली. कविता हे समाजाचे प्रतिबिंब आहे. जगण्याची उर्मी शब्दातून मिळते . विविध प्रश्नांची उत्तरे शोधण्याचे कार्य कविता करते. कवितेचा लळा लागला की आनंदाचा मळा फुलतो.
याप्रसंगी विविध कैद्यांनी उल्लेखनीय कविता सादर करून आपल्या प्रतिभेचे दर्शन घडविले.
ही काव्य मैफिल जवळ पास दिड तास चालली.