Aurangabad Crime : खाण्यासाठी बार दिला नाही म्हणून आवळला होता गळा, अखेर आरोपीला केले गजाआड

औरंंंगाबाद : गेल्या आठवड्यात डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसरातील गोगाबाबा टेकडी परिसरात शफीक खान रफीक खान (वय २८, रा.अरब खिडकी, जयसिंगपुरा) याचा खून करणा-यास गुन्हे शाखा पोलिसांनी गुरूवारी (दि.२६) गजाआड केले. प्रविण उर्फ बाली भास्कर भालेराव (वय २६, रा. जयभिमनगर, घाटी परिसर) असे आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रविण ऊर्फ बालीने आपले साथीदार असलेल्या प्रशांत सुरेश साळवे (वय २३, रा.जयभिमनगर), सोमेश आहिरे (रा.टाऊन हॉल) यांच्या मदतीने १८ सप्टेंबर रोजी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास शफीक खान याला खाण्यासाठी बार मागीतला होता. शफीक खान याने बार देण्यास नकार दिल्यावर प्रविण ऊर्फ बाली व प्रशांत साळवे यांनी शफीक खान याचा गळा आवळून खून केला होता.
पोलिस उपायुक्त मिना मकवाना, गुन्हे शाखेचे सहाय्यक आयुक्त डॉ. नागनाथ कोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक मधुकर सावंत, उपनिरीक्षक विजय जाधव, सहाय्यक फौजदार दिपक ढोणे, जमादार शिवा बोर्डे, रमेश भालेराव, सुरेश काळवणे, संदीप बिडकर, नितीन धुळे यांच्या पथकाने प्रविण ऊर्फ बाली भालेराव याच्या मुसक्या आवळल्या.
तिसरा फरारी आरोपीही अटकेत
या खून प्रकरणातील तिसरा फरारी आरोपी नामे सोमेश रमेश आहिरे वय 23 वर्ष राहणार जय भिम नगर विहिरीजवळ घाटी परिसर औरंगाबाद यास पोस्टेचे पथक प्रमुख पीएसआय बहुरे व त्यांचे सोबत पोलीस कर्मचारी देवा सूर्यवंशी ,सय्यद शकील यांच्या पथकाने ताब्यात घेतले असून पुढील तपास चालू आहे.