Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

पाटीदार समाजाचे सल्लागार डायाभाई मनजीभाई पटेल यांचे वृद्धापकालाने निधन , आज औरंगाबादेत अंत्ययात्रा

Advertisements
Advertisements
Spread the love

औरंगाबाद शहरातील प्रसिद्ध भगवती टिम्बर मार्ट चे मालक आणि पाटीदार समाजातील ज्येष्ठ समाजसेवक  डायाभाई मनजीभाई पटेल यांचे  शनिवार दि. २२ जून २०१९ रोजी रात्री ९.३० वाजता वृद्धापकाने  दुःखद निधन झाले असून उद्या दि. २३ जून २०१९ रोजी सकाळी १०.०० वाजता  “यमुना निवास” प्लॉट न. 46,47 कुशल नगर, जालना रोड, औरंगाबाद येथील निवास स्थानापासून त्यांच्या अंत्ययात्रेस सुरुवात होईल.  कैलाश नगर येथी स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.  त्यांच्या पश्चात पत्नी , चार मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे . मृत्यूसमयी ते ८६ वर्षांचे होते .

Advertisements

शहरातील प्रसिद्ध व्यापारी वीश्रामभाई , विनोदभाई , मंगलभाई, हरीलाल यांचे ते वडील होते तर उद्योजक किशोर,मुकेश,विपीन,कश्यप, हार्दिक निखिल विनायक यांचे ते आजोबा होते.  डायाभाई पटेल  १९६० मध्ये महाराष्ट्रात आल्यानंतर त्यांनी सर्वप्रथम अहमद नगर जिल्ह्यातील कोपरगाव येथे तर १९६४ मध्ये मराठवाड्यात वैजापूर येथे आपले उद्योग सुरु केले पुढे १९७० ते १९७२ या काळात त्यांनी औरंगाबाद येथे आपल्या व्यवसायास प्रारंभ केला आणि आपल्या उद्योगा प्रचंड परिश्रमातून प्रगती केली. पुढे हाच वास आणि आदर्श घेऊन त्यांचे पुत्र आपापल्या उद्योगात यशस्वीरीत्या कार्यरत आहेत .

Advertisements
Advertisements

शहरातील पाटीदार समाजाच्या एकोप्यातही त्यांचे मोलाचे योगदान होते . समाजाचे सल्लागार या नात्याने ते अखेरपर्यंत कार्यरत होते . शहरातील जालना रोडवरील पाटीदार भवनाच्या उभारणीतही त्यांचा महत्वाचा वाट होता. त्यांच्या जाण्यामुळे पाटीदार समाजाची मोठी हानी झाली . डायाभाई  पटेल यांना महानायक ऑनलाईनची भावपूर्ण  आदरांजली .

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!