Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraPoliticalUpdate : पालकमंत्र्यांची यादी जाहीर, छत्रपती संभाजीनगर , बीडच्या पालकमंत्रीपदी नावेही ठरली , धनंजय मुंडे यांचा पत्ता कट ….

Spread the love

मुंबई : राज्य सरकारकडून पालकमंत्र्यांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पुणे आणि बीडच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे पालकमंत्रिपदाच्या यादीतून मंत्री धनंजय मुंडे यांचा पत्ता कट करण्यात आलाय. छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्रीपद मंत्री संजय शिरसाट यांच्याकडे देण्यात आले आहे. अतुल सावे यांच्यावर नांदेडची तर जालना पालकमंत्रीपदी पंकजा मुंडे यांची नेमणूक करण्यात आली आहे.

दरम्यान गडचिरोलीचे पालकमंत्री पद मुख्यमंत्र्यांकडे तर मुंबई शहर आणि ठाण्याचे पालकमंत्री पद एकनाथ शिंदेकडे, नागपूर आणि अमरावतीचे पालकमंत्री पदी चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे देण्यात आले आहे. मुंबई उपनगराचे दोघांकडे पालकत्व आशिष शेलार यांच्याकडे पालकमंत्री पद तर मंगलप्रभात लोढा सहपालकमंत्री असणार आहेत. क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांना कोणतेही जिल्ह्याचे पालकमंत्री पद नाही किंवा सह पालकमंत्री पद देखील नाही. मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर पालकमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आलेली नाही. नाशिकच्या पालकमंत्री पदाची धुरा अखेर गिरीश महाजन यांच्याकडे देण्यात आली आहे. यासाठी दादा भुसे, माणिकराव कोकाटे इच्छुक होते. मात्र दादा भुसे यांच्याकडे कोणतीही जिल्ह्याची पालकमंत्री पदाची जबाबदारी नाही.

राज्यातील सर्व पालकमंत्र्यांची जिल्हानिहाय यादी पुढीलप्रमाणे आहे

– देवेंद्र फडणवीस (मुख्यमंत्री) – गडचिरोली
– एकनाथ शिंदे – (उपमुख्यमंत्री) – ठाणे, मुंबई शहर
– अजित पवार – (उपमुख्यमंत्री) – पुणे, बीड
– चंद्रशेखर बावनकुळे – नागपूर, अमरावती
– राधाकृष्ण विखे पाटील – अहिल्यानगर
– हसन मुश्रिफ – वाशिम
– चंद्रकांत पाटील – सांगली
– गिरीश महाजन – नाशिक
– गणेश नाईक – पालघर
– गुलाबराव पाटील – जळगाव
– संजय राठोड – यवतमाळ
– आशिष शेलार आणि मंगलप्रभात लोढा (सहपालकमंत्री) – मुंबई उपनगर
– उदय सामंत – रत्नागिरी
– जयकुमार रावल – धुळे
– पंकजा मुंडे – जालना
– अतुल सावे – नांदेड
– अशोक उईके – चंद्रपूर
– शंभुराज देसाई – सातारा
– अदिती तटकरे – रायगड
– शिवेंद्रराजे भोसले – लातूर
– माणिकराव कोकाटे – नंदूरबार
– जयकुमार गोरे – सोलापूर
– नरहरी झिरवळ – हिंगोली
– संजय सावकारे – भंडारा
– संजय शिरसाट – छत्रपती संभाजीनगर
– प्रताप सरनाईक – धाराशिव
– मकरंद जाधव – बुलढाणा
– नितेश राणे – सिंधुदुर्ग
– आकाश फुंडकर – अकोला
– बाबासाहेब पाटील – गोंदिया
– प्रकाश आबिटकर आणि माधुरी मिसाळ (सहपालकमंत्री) – कोल्हापूर
– आशिष जयस्वाल (सहपालकमंत्री) – गडचिरोली
– पंकज भोयर – वर्धा
– मेघना बोर्डीकर – परभणी

आपलं सरकार

Click to listen highlighted text!