Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : माजी पंतप्रधान, ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन

Spread the love

नवी दिल्ली : भारताचे दिग्गज माजी पंतप्रधान, ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन झालं आहे. मनमोहन सिंह यांनी वयाच्या 92 व्या अखेरचा श्वास घेतला. त्यांची आज अचानक प्रकृती बिघडल्याने त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते . त्यांना श्वसनास त्रास होत होता. यावेळी मनमोहन सिंह यांच्या फुफ्फुसांमध्ये इन्फेक्शन झाल्याची माहिती समोर आली. डॉक्टरांनी लगेच मनमोहन सिंह यांच्यावर उपचार सुरु केले. त्यांना ऑक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आलं. पण त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती तेव्हाच समोर आली होती. यानंतर काँग्रेसच्या माजी राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी आणि खासदार प्रियंका गांधी या एम्स रुग्णालयात दाखल झाल्या आहेत. 

मनमोहन सिंह यांचा जन्म 26 सप्टेंबर 1932 रोजी पंजाबच्या गाह (सध्याच्या पाकिस्तानातील पंजाब) येथे झाला होता. ते देशाचे 14 वे पंतप्रधान होते. मनमोहन सिंह हे अर्थशास्त्रात उच्चशिक्षित आहेत. त्यांनी पंजाब विद्यापीठ, केम्ब्रिज विद्यापीठ आणि ऑक्सफर्ड विद्यापीठ सारख्या नामांकीत विद्यापीठांमधून शिक्षण घेतलं आहे. त्यांनी 1957 ते 1965 या काळात पंजाब विद्यापीठात प्राध्यापक म्हणून काम केलं आहे.

मनमोहन सिंह 1969-71 या काळात दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या संस्थेत आंतरराष्ट्रीय व्यापार विषयाचे प्राध्यापक होते. त्यानंतर 1976 मध्ये ते दिल्लीमधील जवाहरलाल नेहरू विद्यापिठात मानद प्राध्यापक म्हणून रुजू झाले. विशेष म्हणजे 1982 ते 1085 या काळात भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर होते. तर 1985-87 या काळात भारताच्या योजना आयोगाचे उपाध्यक्ष होते. तसेच 1990 ते 1991 या काळात पंतप्रधानांचे आर्थिक सल्लागार होते. यानंतर 1991 मध्ये ते केंद्र सरकारमध्ये अर्थमंत्री होते.

काँग्रेसची बेळगावमधील सभा रद्द, राहुल गांधी दिल्लीच्या दिशेला रवाना

काँग्रेसची उद्या बेळगावात मोठी सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेसाठी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि खासदार राहुल गांधी हे बेळगावात गेले होते. पण मनमोहन सिंह यांचं निधन झाल्याची माहिती समोर आल्यानंतर ते दिल्लीच्या दिशेला रवाना झाल्याची माहिती समोर येत आहे.

पंतप्रधान मोदींकडून फोनवरुन सिंह यांच्या कुटुंबियांची विचारपूस

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मनमोहन सिंह यांच्या कुटुंबियांना फोन करुन विचारपूस केल्याची माहिती समोर आली आहे. तर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा हे एम्स रुग्णालयात दाखल झाले आहेत. तसेच अनेक दिग्गज नेते एम्स रुग्णालयात दाखल होत आहे. पोलिसांकडून आता दिल्लीतील एम्स रुग्णालयाचा परिसर मोकळा करण्याचं काम सुरु झालं आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!