शिवाजी महाराजांचे एकच गुरु जिजाऊ माँसाहेब; संभाजीराजेंनी अमित शाहांचा दावा खोडला…
मुंबई : संत रामदास त्यांच्या त्यांच्या ठिकाणी माेठे असतील, किंबहुना आहेत, पण छत्रपती शिवाजी महाराज आणि संत रामदास तुम्ही जर जाेडलं तर ते तसं हाेऊ शकत नाही शिवाजी महाराजांचे एकच आदर्श आणि एकच गुरु जिजाऊ माँसाहेब आहेत, अशा शब्दात स्वराज्य पक्षप्रमुख माजी खासदार संभाजीराजे छत्रपती केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलेला दावा खाेडून काढला.
शिराळ्यामध्ये अमित शाह यांनी केलेल्या दाव्यानंतर संभाजीराजे यांनी अत्यंत कडक शब्दात प्रतिक्रिया दिली. संभाजीराजे म्हणाले की, त्यांचं (समर्थ रामदास) महत्त्व असेल तर ते त्या ठिकाणी असावे. त्यांच्या महत्त्वाला आम्ही काय चॅलेंज करत नाही. समर्थ रामदासांना शिवाजी महाराज साेबत जाेडायचं हे बराेबर नाही आणि न पटणारे असल्याचे संभाजीराजे म्हणाले. शिवाजी महाराजांचे एकच आदर्श आणि एकच गुरु जिजाऊ माँसाहेब असल्याचे संभाजीराजे म्हणाले.
शिराळामधील सभेत अमित शाह काय म्हणाले?
शिराळ्यामधील भाजप उमेदवार सत्यजित देशमुख यांच्या प्रचारार्थ बाेलताना अमित शाह म्हणाले की, समर्थ रामदास यांचे पाय या भूमीला लागले आहेत. समर्थ रामदास यांनी गुलामीच्या काळात महाराष्ट्रातील युवकांना एकत्र करून शिवाजी महाराज यांना पाठींबा देण्याचं काम केलं. त्या समर्थ रामदासांना मी नमन करताे. यानंतर संभाजीराजे यांनी शाह यांनी केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली.
शरद पवार याना निवडणुकीत तुम्हाला उत्तर द्यावे लागणार
दरम्यान, अमित शाह यांनी सांगलीमधील सभेत बाेलताना महाविकास आघाडीवर जाेरदार हल्लाबाेल केला. ते म्हणाले की, सांगलीत लवकरच विमानतळाचा प्रश्न मार्गी लावू, या विमानतळावर अनेक ठिकाणाहून लवकरच विमाने धावतील. सांगलीत वसंतदादाच्या नावाने आशिया खंडातील सर्वांत माेठा कारखाना हाेता, ताे कारखाना शरद पवारांनी आणि काँग्रेसने सत्ता असताना विकण्याचा प्रयत्न केला. हळदीच्या व्यापारासाठी मजबूत केंद्र सांगलीत बनवू. महाराष्ट्रात नवीन उद्याेग येत नाहीत असा शरद पवार, मविआ म्हणत आहे. दाेन वर्षात फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट महाराष्ट्रात हाेत आहे. सांगलीत देखील लवकरच नवीन माेठा प्राेजेक्ट हाेणार असल्याचे सांगितले. शरद पवार यांना निवडणुकीत तुम्हाला उत्तर द्यावे लागणार आहे. उद्धव बाबू तुम्हाला आता मुख्यमंत्री बनवणार नाहीत, एवढ्या खालच्या पातळीवर जाऊ नका. छत्रपती संभाजी नगरला विराेध करणाऱ्या राम मंदिराला विराेध करणाऱ्या साेबत तुम्ही बसला आहात. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना तुम्ही सत्तेसाठी तिलांजली दिली आहे.