राहुल गांधी याद राखा, जर आरक्षण संपवले तर आम्ही काँग्रेस संपवल्याशिवाय राहणार नाही : रामदास आठवले
मुंबई : मराठा आरक्षण मिळावे ही आमची भूमिका, पण आमच्यातील देऊ नका, आम्हालाच कमी दिले आहे. जरांगे पाटील साहेब सरकारने 10 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. लाडकी बहिण याेजना लाेकप्रिय याेजना आहे. अनेक कराेडाे बहिणांना फायदा हाेणार आहे, कांद्याला चांगला भाव मिळाला पाहिजे असा प्रयत्न आहे, त्यासाठी निवडणुकीत महायुतीला निवडून द्यायचे आहे, दलित जनतेला आवाहन आहे, महायुतीला निवडून द्यायचे असल्याचे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी म्हटले आहे. लंडनमध्ये स्मारक फडणवीस असताना बनवले, 41 काेटीत घर विकत घेतले. इंदू मिलची जागा 3 हजार 600 काेटींची जमीन आहे, आता स्मारक हाेत आहे. इंडिया गेटबाजूला स्मारक हाेत आहे.
राहुल गांधी याद राखा जर आरक्षण संपवले तर आम्ही कांग्रेस संपवल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा रामदास आठवले यांनी दिला. संविधान वाचवण्यासाठी महायुतीला मतदान करा. रामदास आठवले कविता करत म्हणाले की, वाढवायची आहे आपल्याला महाराष्ट्राची शान, साऱ्या देशाचे आहे नरेंद्र माेदींकडे ध्यान, महाराष्ट्र सुटलाय महायुतीचा वारा नरेंद्र माेदींसाठी जमलाय जनसमुदाय सारा देऊया भारत मातेचा नारा आणि वाजवूया मविआचे बारा. आठवले म्हणाले की, माेदी आल्यानंतर गडकरींना रस्ते विभाग दिला आणि अनेक ठिकाणी रस्ते झाले. स्टेशनची रेल्वे कनेक्टिविटी चांगली झाली आहे. शेतकèयांना मदत हाेत आहे, लाेकांना धान्य देण्यात येत आहे. 25 काेटी लाेकं 10 वर्षात गरीबीवर आले आहेत. आपली आर्थिक स्थिती चांगली आहे, मविआवाले म्हणतात प्रगती नाही.
साेनिया गांधींनी पवारांना पंतप्रधान बनवले नाही, पवारांवर अन्याय केला
त्यांनी सांगितले की, उद्धवजी आपण केले काय? मविआ हाय हाय, उद्धवजी आपण केलं काय? घरात बसा, काही हरकत नाही. बाळासाहेब मला म्हणाले हाेते, शिवशक्ती भीमशक्ती साेबत आली पाहिजे. मी ज्यांच्यासाेबत जाताे त्यांचा विजय हाेताे, ज्यांच्याविराेधात जाताे त्यांचा सत्यनाश हाेताे. उद्धवजी म्हणाले मी तिकडे जाताे, मी म्हणालाे जा, पण धनुष्यबाण इकडे येणार आहे. पवार साहेबांना म्हणालाे मी इकडे आलाे तर तुम्ही तिकडे काय करता आहात. साेनिया गांधींनी पवारांना पंतप्रधान बनवले नाही, पवारांवर अन्याय केला. आपण लाेकसभेत विराेधी पक्षनेते असताना आम्ही आपल्यासाेबत हाेताे. तेव्हा साेनिया गांधींना बाेललाे की त्यांना संधी द्या, पण तसे काही झाले नाही.