पंतप्रधान माेदींनी महाविकास आघाडीला घेरले, काँग्रेस आणि त्यांचे मित्र पक्ष जातीच्या आधारावर लाेकांमध्ये फूट पडताहेत…
एससी-एसटी आणि ओबीसींच्या प्रगतीला काँग्रेसचा विरोध
नाशिक : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी नाशिकमध्ये सभा घेत कार्यकर्त्यांना संबाेधित केलं. यावेळी पंतप्रधान नरेंद्र माेदी म्हणाले, ’’महाराष्ट्रात उज्ज्वला गॅस याेजनेअंतर्गत 5 लाखांहून अधिक महिलांना मोफत गॅस कनेक्शन देण्यात आलं. जल जीवन अभियानांतर्गत राज्यातील 1.25 काेटींहून अधिक कुटुंबांना नळाच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. 7 काेटी गरीब लाेकांना दर महिन्याला मोफत रेशन मिळत आहे, 26 लाखांहून अधिक लाेकांना पीएम आवास याेजनेचा फायदा झाला आहे, त्यांना स्वत:चं घर सरकारकडून देण्यात आलं, त्यामुळं महाराष्ट्रात पुन्हा महायुतीचं सरकार येणं आवश्यक आहे.’’
डबल इंजिनच्या सरकारमध्ये विकासाचा वेग दुप्पट हाेताे. त्यासाेबतच याेजनांचा लाभही दुप्पट हाेताे. पीएम किसान सन्मान निधी याेजनेचा येथील शेतकऱ्यांना लाभ मिळत आहे. या याेजनेअंतर्गत 12 हजार रुपयांची आर्थिक मदत मिळते. राज्यात पुन्हा आमचं सरकार आल्यावर ही 12,000 रुपयांची मदत वाढवून 15,000 रुपये केली जाईल, ज्यामुळं लाखाे शेतकरी कुटुंबांना माेठा फायदा हाेईल,’’असं पंतप्रधान नरेंद्र माेदी म्हणाले.
’जम्मू-काश्मीरमध्ये स्वातंर्त्याच्या 75 वर्षानंतर भाजपाच्या नेतृत्वाखाली आमच्या सरकारनं कलम 370 हटवून भारताचं संविधान लागू केलं. तेथील दलित, वंचितांम त्यांचा हक्क मिळवून दिला. मात्र विधानसभेत सत्ता येताच काँग्रेस व त्यांच्या बगलबच्यांनी पुन्हा तेथे कलम 370 लागू करण्याचा प्रस्ताव पारीत केला आहे. काश्मीरमध्ये संविधानाला पायदळी तुडवायचं आणि इकडे महाराष्ट्रात येवून संविधानाचा जप करीत लाेकांमध्ये धूळेक करायची, अशी दुहेरी निती काँग्रेसवाल्यांनी चालविली आहे. महाविकास आघाडीवाले देशाला मागे खेचण्याचं काम करतायत. काँग्रेस आणि त्यांचे मित्र पक्ष जातीच्या आधारावर लाेकांमध्ये फूट पाडत आहेत. एससी-एसटी आणि ओबीसींची प्रगती हाेऊ नये, अशी त्यांची इच्छा आहे. काँग्रेसच्या या धुळेफेकीला वेळीच ओळखून त्यांना त्यांची जागा दाखवावी,’’ असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी जाहीर सभेत बाेलताना केले.
सभेतील ठळक मुद्दे :
-पंतप्रधान माेदींचा ’जय भवानी जय शिवाजी’चा नारा.
-प्रभू राम पदस्पर्शाने पावन झालेल्या नगरीला माझा नमस्कार.
-मी अनुष्ठानची सुरुवात काळाराम मंदिरमधून केली, तिथे सेवा पण केली.
-विकसित भारतसाठी नाशिकचा आशीर्वाद घेण्यासाठी आलाे आहे.
-भाजपा, महायुती आहे तर गती आहे, महाराष्ट्राची प्रगती आहे.
-पु ल देशपांडे यांना श्रद्धांजली अर्पण करताे.
-गरीबाची चिंता करणारं सरकार आहे देशात
-काँग्रेसने फक्त ’गरिबी हटावाे’चा नारा दिला
-25 कराेड लाेक गरिबीमधून बाहेर आले.
-माेदी गरिबांचा सेवक म्हणून काम करत आहे.
-महाराष्ट्रमध्ये 50 लाख महिलांना गॅस याेजना, शेती याेजना, शेतकèयांना वार्षिक 12 हजार मदत वाढवून ती 15 हजार करणार.
-डबल इंजिन सरकारमध्ये विकास गती वाढणार.
-कांदा निर्यात सवलत दिली
-महाराष्ट्र पुढे जाईल तर देश पुढे जाईल
-महाराष्ट्र प्रगती करत आहे.
-काॅग्रेस चांगल्या कामाचा विराेध करत आहे. अटल सेतू, मेट्राे, समृद्धीचे काम थांबवण्याचे काम काँग्रेसने केले
-आघाडी सरकार लांब ठेवा
-नाशिक प्रगती करत आहे. चागले रस्ते हाेत आहेत. आयटी पार्क हाेत आहे. कुंभमेळामध्ये याचा फायदा हाेत आहे
-लढाऊ विमान नाशिकमध्ये तयार हाेत आहेत
-काॅग्रेसवाले ’खाली पन्ने वाली ’किताब लेकरं घुमते हे’
-काँग्रेस बाबासाहेबांचं संविधान हटवण्यासाठी प्रयत्न करत आहे.
-भाजपाचा मुकाबला करण्यासाठी काँग्रेसनं ’झूठ की दुकान’ सुरू केली आहे.
-काही काँग्रेस राज्यात सरकार चालवण्यासाठी त्यांच्याकडं पैसे नाही. लाेकांकडून टॅक्स लावून पैसे गाेळा करत आहे.
-काँग्रेस एसी, एसटी, ओबीसी समाजची एकता ताेडू पाहत आहे.
-सत्तेसाठी काँग्रेस ओबीसीमध्ये वाद लावत आहे.
-हम एक है ताे सेफ है…
-आज एक ओबीसी सर्वांच्या आशीर्वादाने देशाचा तिसऱ्यांदा पंतप्रधान झाला आहे.
-त्यामुळे काँग्रेसला झाेप लागत नाही.
-लाडकी बहीण याेजना बंद करण्यासाठी काँग्रेस काेर्टात गेली
-3 कराेड महिलांना लखपती बनवत आहे.