PuneAccidentCourtUpdate : ‘त्या” अपघात प्रकरणातील पती – पत्नीला ५ जूनपर्यंत पोलीस कोठडी

पुणे : पुण्यातील पोर्शे अपघात प्रकरणी अल्पवयीन पालकाच्या आई – वडिलांच्या अडचणीत आणखी वाढ झाली असून न्यायालयाने या दोघांनाही ५ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. यावेळी तपास अधिकाऱ्यांनी दोन्ही आरोपींचे डीएनए नमुने घ्यायचे असून ३ लाख रुपये कोणाकडून घेतले याचा तपास करायचा असल्याचे न्यायालयात सांगितले. अल्पवयीन आरोपीला वाचवण्यासाठी त्याच्या आईने रक्ताचे नमुने दिल्याचे या प्रकरणाच्या तपासात समोर आले असून अल्पवयीन आरोपीच्या आईने स्वतःच ही काबुली दिली आहे.
दरम्यान शिवानी अग्रवाल आणि विशाल अग्रवाल यांच्या वकिलांनी न्यायालयात रक्ताचे नमुने हे शिवानी अग्रवाल यांचे असल्याचे कबूल केले असून रक्ताचे नमुने आमच्या अशीलानेच दिले आहेत आणि ऑनरेकॉर्ड आम्ही हे मान्य केले असल्याचे न्यायालयासमोर सांगितले. तसेच शिवानी अग्रवाल स्वत: सरेंडर झाल्या असल्याने त्यांच्या पुढील तपासाची गरज नाही. त्यामुळे पोलीस कोठडी ऐवजी MCR मिळण्यासाठी वकिलांनी विनंती केली. मात्र चौकशी अधिकाऱ्यांनी न्यायालयात सांगितले की, साक्षीदार, एफ एस एल यांच्या तपासातून निष्पन्न झाले की विधी संघर्षात बालकाच्या ऐवजी आईचे रक्त वापरण्यात आले.
या सगळ्या षडयंत्र मध्ये आणखी काही आरोपी असण्याची शक्यता आहे. दोन्ही आरोपींचे डी एन ए सँपल घ्यायचे आहेत. तसेच ३ लाख रुपये कोणाकडून घेतले आहेत याचा तपास करायचा आहे. मूळ रक्त नमुने आणि त्यातील सिरींज कोणाला दिली याचा शोध घ्यायचा आहे. विशाल, शिवानी यांच्या घराची झाडाझडती आहे. त्यामुळे आरोपींना ७ दिवसांची पोलीस कोठडी देण्यात यावी अशी न्यायालयाला चौकशी अधिकाऱ्यांनी विनंती केली होती.
त्यावर सरकारी वकिलांनी रक्त बदलण्याच्या प्रकरणी पालकांचा थेट सहभाग असल्याचे म्हटले . विधी संघर्ष बालकाचे हे पालक आहेत. शिवानी अगरवाल हिला ससूनमध्ये जायला कोणीतरी सांगितले ? रक्ताचे नमुने देण्यासाठी शिवानी यांना कोणी सांगितले ? यासाठी तपास करायचा आहे. सखोल चौकशीसाठी ७ दिवसांची पोलीस कोठडी देण्यात यावी अशी मागणी सरकारी वकिलांनी केली होती.
दरम्यान आरोपींच्यावतीने वकिलांनी न्यायालयात सांगितले की, १९ तारखेला अपघात झाल्यानंतर घराची झाडाझडती घेण्यात आली आहे. सी सी टिव्ही सुद्धा जप्त करण्यात आले आहेत. दोन्ही आरोपींनी स्वतःहून पोलिसांना सरेंडर केले आहे. तपास अधिकाऱ्यांना कधी ही गरज लागली तर आरोपी हजर राहतील म्हणून त्यांना न्यायालयीन कोठडी मिळावी. तसेच यात कोणतेही षडयंत्र झाले असे आम्हाला असे वाटत नाही.