Lok Sabha Election Results: लोकसभा निवडणूक २०२४ निकालाच्या महत्त्वाच्या अपडेट

Lok Sabha Election Results LIVE: लोकसभा निवडणूक २०२४ निकालाचे महत्वाच्या अपडेट-
NDA
Won : 1
Leading : 244
INDIA
Won : 0
Leading : 244
- उत्तर प्रदेशमध्ये सपाने भाजपाला टाकलं मागे. उत्तर प्रदेशात सपाला २७ जागांवर आघाडी मिळाली आहे तर भाजप 26 जागांवर आघाडीवर आहे.
- वाराणसीतून पंतप्रधान नरेंद्र मोदी ६३०० मतांनी पिछाडीवर
- अमरावतीत नवनीत राणा आघाडीवर
- हिमाचल प्रदेशच्या मंडी लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या उमेदवार कंगना रनौत १२९४ मतांनी आघाडीवर
- अमेठीतून केंद्रीय मंत्री स्मृती इराणी पिछाडीवर
- विजयी उमेदवार (भारतीय जनता पार्टी) : सुरत (२४) मुकेशकुमार चंद्रकांत दलाल (भाजप)
- केरळच्या वायनाड लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार राहुल गांधी ८७१८ मतांनी आघाडीवर
- बारामतीत सुप्रिया सुळे आघाडीवर
संपूर्ण जगाचे लक्ष लागलेल्या भारतातील लोकसभा निवडणुकीचे निकाल आज ४ जून रोजी जाहीर होत आहे. जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीच्या या उत्सवात कोणाचा विजय होतो हे पुढील काही तासांत समोर येईल.