Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Loksabha2024 Update : एक्झिट पोलच्या गदारोळात एका एक्झिट पोलचा हटके अंदाज , मोदींना ४०० पार नव्हे मिळणार २५० जागा….

Spread the love

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीसाठीच्या सातव्या टप्प्यानंतर काल विविध वृत्तवाहिन्या आणि संस्थांनी आपले एक्झिट पोल प्रसिद्ध केल्यानंतर उलट सुलट चर्चा सुरु झाली आहे. कारण जवळपास सर्वच एक्झिट पोलमधून केंद्रामध्ये तिसऱ्यांदा मोदीच पंतप्रधान बनतील आसा दावा करण्यात आला आहे . या एक्झिट पोलमधून भाजपा ३०० हून अधिक तर एनडीएला ३५० ते ४०० जागा मिळतील, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. मात्र , एका एक्झिट पोलने मात्र मोदींच्या नेतृत्वाखालील एनडीएला २५० जागांपर्यंत मजल मारणेही कठीण होणार असून काँग्रेसच्या नेतृत्वाखालील इंडिया आघाडी बहुमताच्या आकड्याजवळ पोहोचेल, असा दावा केला आहे.

या संदर्भात लोकमतने वृत्त दिले आहे . या वृत्तात म्हंटले आहे की , हिंदी वर्तमानपत्र देशबंधूने डीबी लाईव्ह या युट्युब चॅनेलवरून हा एक्झिट पोल प्रसारित केला आहे. ४ जून रोजी लागणाऱ्या निकालानंतर त्रिशंकू लोकसभा किंवा इंडिया आघाडीला बहुमत मिळेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या एक्झिट पोलमधून करण्यात आलेल्या दाव्यांनुसार मोदी आणि भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएला २०७ ते २४१ जागा मिळतील, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर काँग्रेसच्या नेतृत्वाखालील इंडिया आघाडीला २५५ ते २९० जागा मिळतील, असा दावा करण्यात आला आहे. तर इतरांच्या खात्यात २९ ते ५१ जागा जातील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

दरम्यान काल एक्झिट पोलमधून वर्तवण्यात आलेल्या अंदाजानुसार उत्तर प्रदेशमध्ये सपा आणि काँग्रेसच्या इंडिया आघाडीला ३२ ते ३४ तर भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएला ४६ ते ४८ जागा मिळतील, असा दावा करण्यात आला आहे. तर महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला २८ ते ३० आणि महायुतीला १८ ते २० जागांवर समाधान मानावे लागू शकते, अशी शक्यता वर्तवली आहे. बिहारमध्ये इंडिया आघाडीला २४ ते २६ तर एनडीएला १४ ते १६ जागा मिळतील, असा दावाही या एक्झिट पोलमधून करण्यात आला आहे.

विशेष म्हणजे काँग्रेसला सर्वाधिक अपेक्षा असलेल्या कर्नाटकमध्ये काँग्रेसला १८ ते २० तर एनडीएला ८ ते १० जागा मिळतील , असा दावा कालच्या एक्झिट पोलमध्ये करण्यात आला आहे. याशिवाय पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसला २६ ते २८ आणि भाजपाला ११ ते १३ आणि काँग्रेसला २ ते ४ जागा मिळतील, असा दावा करण्यात आला आहे. तसेच तामिळनाड़ूमध्ये इंडिया आघाडीला ३७ ते ३९ जागा मिळतील, अशी शक्यताही या एक्झिट पोलमधून वर्तवण्यात आली आहे.

एक्झिट पोल काय म्हटले आहे ?

दरम्यान  काल प्रसिद्ध झालेल्या अनेक एक्झिट पोलमधून एनडीएला ३५० ते ४०० पर्यंत जागा देण्यात आल्या होत्या. इंडिया टुडे अॅक्सिस माय इंडिया, न्यूज २४ टुडेज चाणक्य आणि इंडिया टीव्ही सीएनएक्स या एक्झिट पोलमधून भाजपा ४०० पार मजल मारेल, असा दावा करण्यात आला आहे.इंडिया टुडे अॅक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलमधून एनडीएला ३६१ ते ४०१, इंडिया आघाडीला १३१ ते १६६ आणि इतरांना ८ ते २० जागा मिळतील, अशी शक्यता वर्तवली आहे. तर न्यूज २४ टुडेज चाणक्यच्या एक्झिट पोलने एनडीएला ४००, इंडिया आघाडीला १०७ आणि इतरांना १५ जागा मिळतील, असा अंदाज वर्तवला आहे. इंडिया टीव्ही सीएनएक्सच्या एक्झिट पोलमधून एनडीएला ३७१ ते ४०१, इंडिया आघाडीला १०९ ते १३९ आणि इतरांना २८ ते ३८ जागा मिळतील अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!