Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

उष्णतेचा कहर : जळगाव नंतर आता आकोल्यातही कलम 144 अन्वये जमावबंदी आदेश लागू

Spread the love

अकोला : कोरोना काळात तुम्ही संचारबंदी किंवा लॉकडाऊनचा अनुभव घेतला असेल पण यंदा ऊन्हामुळे अशी वेळ येऊ शकेल अशी कल्पनाही कुणी केली नसेल मात्र या वर्षी उष्णतेचा धोका लक्षात घेता अकोल्याचे जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी अकोला जिल्ह्यात 31 मे’ पर्यंत कलम 144 अन्वये जमावबंदी लागू केली आहे. शनिवारी  काल 25 मे रोजी हा आदेश निर्गमित केला आहे. दरम्यान आज अकोल्यात 45.06 अंश एवढं तापमान नोंदवण्यात आले आहे . तत्पूर्वी जळगाव जिल्ह्यातही तापमानाचा कहर पाहायला मिळत असून तेथील जिल्हाधिकाऱ्यांनीही   जिल्ह्यात 144 कलम लागू केले आहे. मात्र, हे कलम लागू करण्यामागचा उद्देशही त्यांनी स्पष्ट केला आहे. तसेच, 144 लागू करणे म्हणजे संचारबंदी किंवा लॉकडाऊन नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. 

दरम्यान प्रादेशिक हवामान विभागाच्या नागपूर येथील कार्यालयाचा संदेश 25 मे 2024 रोजी प्राप्त झाला. त्यानुसार 25 ते 31 मे पर्यंत उष्णतेच्या लाटेची शक्यता वर्तवली आहे. जिल्ह्यातील तापमानाचा पारा 44 ते 45.8 अंश सेल्सियसपर्यंत आहे. उष्माघातामुळे सामान्य नागरिक, कामगार, विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये, यासाठी कामगारांना सेवा पुरवणे, खासगी क्लासेसच्या वेळेत बदल करणे व अन्य उपाय योजना प्रभावीपणे राबवणे आवश्यक असल्याचे जिल्हादंडाधिकारी अजित कुंभार यांच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे 25 मे रोजीच्या दुपारी 4 वाजेपासून ते 31 मेपर्यंत फौजदारी प्रक्रीयात संहिताचे कलम 144 चे आदेश करण्यात येत असल्याचे आदेशात म्हटले आहे.

जिल्हाधिदंडाधिकारी कुंभार यांनी निर्गमित केलेल्या आदेशानुसार अंगमेहनत करणारे कामगार आणि औद्योगिक क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांकडून उन्हात काम करून घेता येणार नाही. कामाच्या ठिकाणी उष्माघातापासून संरक्षासाठी पुरेसे शेड तयार करणे, पंखे, कुलर किंवा अन्य साधनांची व्यवस्था, पिण्याचे पुरेसे पाणी व प्रथमोपचार पेटी ठेवणे, याची जबाबदारी संबंधित आस्थापना मालकांची राहणार आहे. याबाबत काही तक्रार असल्यास संबंधित ग्राम पंचायत, महानगरपालिका, नगर परिषद, पोलिस प्रशासन, कामगार कल्याण विभागाकडे तक्रार करता येईल. खासगी शिकवणी वर्गाच्या संचालकांनी सकाळी 10 वाजतापर्यंत व सायंकाळी 5 नंतर कोचिंग सेंटर चालवावेत.

सकाळी 10 ते 5 वेळेत क्लास सुरु ठेवायचे असल्यास तेथे पंखे, कुलर किंवा अन्य साधनांची व्यवस्था करण्याची जाबबदारी संबंधित क्लासच्या संचालकांची राहणार आहे, असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

गेल्या सात दिवसांतील अकोल्याचं तापमान

तारीख तापमान (सेल्सिअस अंशांमध्ये)
18 मे 42.0
19 मे 43.2
20 मे 43.8
21 मे 44.0
22 मे 44.8
23 मे 45.5
24 मे 45.8
25 मे 45.6

आपलं सरकार

Click to listen highlighted text!