Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

माझ्या संयमाची परीक्षा पाहू नको : माजी पंतप्रधान देवेगौडा आजोबांचा नातू प्रज्वल रेवन्नाला तत्काळ भारतात परतण्याचा इशारा…

Spread the love

बंगळुरू : कर्नाटकातील हसन लोकसभा मतदारसंघातील जेडीएसचे खासदार प्रज्वल रेवन्ना अद्याप फरार आहेत. यासंदर्भात माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांनी त्यांचा नातू प्रज्वल रेवन्ना यांना लवकरात लवकर भारतात परतण्याचा संयमाची परीक्षा न घेण्याचा इशारा दिला आहे. माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांनी पुढे त्याच्यावरील आरोप खरे असल्याचे सिद्ध झाल्यास त्यांना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे, असे म्हटले आहे.

माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांनी X वरील पोस्टमध्ये लिहिले आहे की , ” प्रज्वल रेवन्ना यांनी जेथे असतील तेथून त्यांनी ताबडतोब भारतात यावे आणि कायदेशीर प्रक्रियेला सामोरे जावे. त्यांनी यापुढे माझ्या संयमाची परीक्षा घेऊ नये.” घेतले.”

‘मला प्रज्वलच्या परदेश दौऱ्याबद्दल माहिती नाही’

दरम्यान देवेगौडा यांनी प्रज्वल रेवन्ना यांना “माय वॉर्निंग…” नावाचे दोन पानी चेतावणी पत्र लिहिले. त्या पत्रात त्यांनी लिहिले की, “गेल्या काही आठवड्यांत लोकांनी माझ्या आणि माझ्या कुटुंबाविरोधात कठोर शब्द वापरले आहेत. प्रज्वलच्या कार्याबद्दल मला काहीही माहिती नाही हे मी लोकांना समजावूनही सांगू शकत नाही. शिवाय मी त्यांना समजावूनही सांगू शकत नाही की मी त्याला वाचवण्याचा प्रयत्न करत नाहीये. मला त्याच्या परदेश दौऱ्याबद्दल काहीच माहीत नव्हते. माझा विवेकावर विश्वास आहे. मी देवावर विश्वास ठेवतो आणि मला माहित आहे की देवाला सर्व सत्य माहित आहे.”

‘आजोबांचा आदर असेल तर प्रज्वलने परतावे’

महिनाभरापूर्वी देश सोडून पळून गेलेल्या प्रज्वल रेवण्णाला इशारा देताना एचडी देवेगौडा म्हणाले की, प्रज्वलला त्याच्या आजोबांचा आदर असेल तर त्याने परत यावे. त्याने पुढे लिहिले की, “मी फक्त एकच गोष्ट करू शकतो. मी प्रज्वलला कडक ताकीद देऊ शकतो. तो कुठेही असला तरी, मी त्याला परत येण्यास सांगू शकतो आणि पोलिसांसमोर आत्मसमर्पण करण्यास सांगू शकतो. हे केवळ आवाहन नसून हा प्रज्वल याला माझा इशारा आहे.”

‘कुटुंबापासून विभक्त होणार’

देवेगौडा यांनी प्रज्वलला असेही सांगितले की, जर त्याने कुटुंबातील सदस्यांचे आदेश पाळले नाहीत तर आपण कुटुंबापासून पूर्णपणे विभक्त होऊ. त्यांनी पुढे लिहिले आहे की, प्रज्वलने या इशाऱ्याकडे लक्ष दिले नाही तर त्याला माझ्या आणि कुटुंबातील सर्व सदस्यांच्या रोषाला सामोरे जावे लागेल.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!