Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Lok Sabha Election 2024 Live: राज्यातील 11 तर देशभरात 93 जागांसाठी सुरू आहे मतदान , पहा कुठे किती मतदान ? कशी आहे परिस्थिती ?

Spread the love

देशात सर्वत्र तिसऱ्या आज (मंगळवार, ७ मे) लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यासाठी मतदान चालू आहे . यंदा लोकसभा निवडणूक एकूण सात टप्प्यांत होत आहे. यापैकी १९ एप्रिलला पहिला टप्पा आणि २६ एप्रिलला दुसरा टप्पा पार पडला आहे.  यामध्ये इंडिया आघाडी आणि भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीत चुरस निर्माण झाली आहे. तिसऱ्या टप्प्यात देशातील १० राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशामधील एकूण ९३ जागांसाठी मतदान होणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील ११ लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे. या टप्प्यात मतदान होणाऱ्या महाराष्ट्रातील काही मतदारसंघाकडे अवध्या देशाचे लक्ष लागलं आहे. यात बारामती, कोल्हापूर, सांगलीसह इतर काही मतदारसंघांचा समावेश आहे.

१ वाजेपर्यंत देशभरात कुठे किती मतदान ?

आसाम- 45.88%

बिहार- 36.69%

बंगाल- 49.27%

मध्य प्रदेश- 44.67%

गुजरात- 37.83%

उत्तर प्रदेश- 38.12%

कर्नाटक- 41.59%

छत्तीसगड- 46.14%

गोवा- 49.04%

महाराष्ट्र- 31.55%

गुजरात- 37.83%

पश्चिम बंगालमध्ये दुपारी 1 वाजेपर्यंत सर्वाधिक 49.27% ​​मतदान, एमपीच्या भिंडमध्ये मतदान केंद्रापासून 400 मीटर अंतरावर गोळी झाडली.

राज्यातील एकूण ११ लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे-

लातूर- २०.७४ टक्के,

सांगली – १६.६१ टक्के,

बारामती – १४.६४ टक्के,

हातकणंगले – २०.७४ टक्के,

कोल्हापूर -२३.७७ टक्के,

माढा -१५ .११ टक्के,

उस्मानाबाद -१७.०६ टक्के,

रायगड -१७.१८ टक्के,

रत्नागिरी -सिंधुदूर्ग-२१.१९ टक्के,

सातारा -१८.९४ टक्के,

सोलापूर -१५.६९ टक्के

माढा लोकसभेचे भाजपा उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी मतदानाचा हक्क बजावला.

धैर्यशील मोहिते पाटील यांनी मतदानाचा हक्क बजावला

बारामतीत पहिल्या चार तासांत किती मतदान?

बारामती लोकसभा मतदारसंघासाठी सुरुवातीच्या दोन तासात ५.७७ टक्के मतदान झाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. सकाळी ११ वाजेपर्यंत या मतदारसंघात १४.६४ टक्के मतदान झाले. आतापर्यंत सर्वाधिक १८.६३ टक्के मतदान बारामती विधानसभा मतदारसंघात झाले आहे. त्या खालोखाल इंदापूर विधानसभा मतदारसंघात १४.६८ टक्के मतदान झाले आहे. पुरंदर विधानसभा मतदारसंघात १४.८ टक्के, खडकवासला विधानसभा मतदारसंघात १४ टक्के, भोर १३.८ टक्के, तर दौंडमध्ये १२ टक्के मतदान झाले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी मतदानाचा हक्क बजावला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमदाबादमध्ये मतदानाचा हक्क बजावला आहे. तसेच यावेळी पंतप्रधान मोदींनी जनतेला मतदान करण्याच आवाहन केले.

शरद पवार, सुप्रिया सुळे यांचं मतदान

कोल्हापूर-बारामतीत कांटे की टक्कर

कोल्हापुरात शाहू महाराज आणि विद्यमान खासदार तथा महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांच्यात कांटे की टक्कर पाहायला मिळणार आहे. तर, हातकणंगलेमध्ये ठाकरे गटाचे सत्यजित पाटील, महायुतीचे धैर्यशील माने आणि शेतेकरी राजू शेट्टी यांच्यात तिरंगी लढत होणार आहे. सांगलीत महायुतीचे संजय काका पाटील यांच्याविरुद्ध ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील आणि अपक्ष विशाल पाटील (काँग्रेसचे माजी नेते) यांच्यात लढत होत आहे. बारामतीमध्ये महाविकास आघाडीकडून विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांच्याविरुद्ध महायुतीच्या सुनेत्रा पवार (उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी) यांच्यात सामना होणार आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या पत्नी तथा बारामती लोकसभेच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी काटेवाडी या त्यांच्या मूळ गावी जाऊन मतदानाचा हक्क बजावला.

माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, त्यांच्या पत्नी, आमदार तथा सोलापूर लोकसभेच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी पहाटेच मतदानाचा अधिकार बजावला.

अजित पवारांच्या मातोश्रींनी बजावला मतदानाचा हक्क

आमदार रोहित पवार आणि त्यांच्या कुटुंबीयांनी मतदान केले.

बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख आणि त्याची पत्नी अभिनेत्री जिनिलिया देशमुख या दोघांनी मुंबईवरून लातूरला जाऊन मतदानाचा हक्क बजावला.

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि रायगडचे महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे आणि त्यांच्या कुटुंबीयांनी रोहा तालुक्यातील दुरटोली या मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला.

शेकाप सरचिटणीस आमदार जयंत पाटील आणि त्यांच्या कुटुंबीयांनी अलिबाग तालुक्यातील शेजारी मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि रायगडचे महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे आणि त्यांच्या कुटुंबीयांनी रोहा तालुक्यातील दुरटोली या मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला.

धैर्यशील मोहिते पाटील यांनी मतदानाचा हक्क बजावला

धैर्यशील माने आणि सत्यजित पाटलांच्या कार्यकर्त्यांची जोरदार हाणामारी

हातकणंगले लोकसभा मतदारसंघात वाळवा तालुक्यातील साखराळे गावात मतदान केंद्रावर महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने आणि महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील सरुडकर यांच्या कार्यकर्त्यांत जोरदार राडा झाला. वाळवा तालुक्यातील साखराळे गावातील बूथ क्रमांक 62 आणि 63 वर हा प्रकार घडला. पोलिसांनी हस्तक्षेप करत भांडणाऱ्या कार्यकर्त्यांना बुथमधून बाहेर काढल्याने तणाव निवळला. पोलिसांनी वेळेत हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला.

वंचितच्या शिर्डी लोकसभेच्या उमेदवार उत्कर्षा रुपवते यांच्या गाडीवर दगडफेक
कार्यकर्त्यांना संयम राखण्याचे आवाहन

वंचित बहुजन आघाडीच्या शिर्डी लोकसभा मतदारसंघातील उमेदवार उत्कर्षा रुपवते यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात गाडीच्या समोरील काचा फुटल्या असून उत्कर्षाताई रुपवते सुखरूप असल्याची माहिती आहे. रस्त्यालगतच्या झाडीतून दगडफेक करत हा हल्ला करण्यात आला. दगडफेकीनंतर हल्लेखोर घटनास्थळावरुन पळून गेले. दरम्यान रात्री अकोले राजूर ( जिल्हा अहिल्यानगर) येथील प्रचारदौरा संपवून संगमनेरला परत येत असताना माझ्या कारवर दगडफेक झाली. मी सुखरूप असून या क्षणी राजूर पोलीस स्टेशन मध्ये आहे. कार्यकर्त्यांनी घरीच राहावे. राजूरच्या दिशेने कोणीही येऊ नये. कृपया संयम राखा. आपल्याला निवडणुक तडीस न्यायची आहे.उद्या माझा कोपरगावचा पूर्वनियोजित दौरा ठरल्याप्रमाणे होणार आहे,आपण तिकडे भेटुयात असे आवाहन उत्कर्षा रुपवते यांनी कार्यकर्त्यांना केले आहे

शिर्डी मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीच्या उत्कर्षा रुपवते यांचा जोरदार झंझावात सुरू असल्यानेच राजकीय सुडातून हा हल्ला झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. प्रस्थापित उमेदवारांना रूपवते यांचा निवडणुकीत धोका वाटत असल्याची चर्चा सुरू आहे.

उत्कर्षा रुपवते यांनी काही दिवसांपूर्वीच काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला होता. रुपवते या शिर्डीतून उमेदवारीसाठी इच्छूक होत्या. मात्र, महाविकास आघाडीच्या जागावाटपात शिर्डी लोकसभा मतदारसंघ ठाकरे गटाच्या वाट्याला आला. त्यामुळे ठाकरे गटाने भाऊसाहेब वाकचौरे यांना उमेदवारी दिली. त्यामुळेच नाराज होऊन उत्कर्षा रुपवते यांनी वंचितमध्ये प्रवेश करत शिर्डी लोकसभेची उमेदवारी मिळवली होती.

कर्नाटकात आम्हाला बहुमत मिळेल- खर्गे

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले, कर्नाटकात आम्हाला बहुमत मिळेल. असा अहवाल आज आमचे काँग्रेस अध्यक्ष शिवकुमार यांनी दिला आहे. हैदराबादमध्ये परिस्थिती चांगली आहे .

Leave a Reply

आपलं सरकार

Click to listen highlighted text!