Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणातील आरोपी प्रा. शोमा सेन यांना जामीन मंजूर

Spread the love

नवी दिल्ली : भीमा कोरेगावर हिंसाचार प्रकरणातील आरोपी प्रा. शोमा सेन यांना सुप्रीम कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. प्रा. सेन यांच्यावर युएपीए कलमांतर्गत गुन्हा दाखल झाला होता. याचे पुरावे नसल्यानं आपल्याला जामीन मंजूर व्हावा अशी मागणी करणारी याचिका त्यांनी सुप्रीम कोर्टात दाखल केली होती.

भीमा कोरेगावर-एल्गार परिषद प्रकरणात माओवाद्यांशी संबंध असल्याचा आणि भीमा कोरेगावर हिंसाचारात गुन्हेगारी कट रचल्याप्रकरणी नागपूर विद्यापीठाच्या माजी प्राध्यापक शोमा सेन यांच्यासह १४ कार्यकर्ते आणि शिक्षणतज्ज्ञांवर बेकायदा कारवाया प्रतिबंध कायद्यांतर्गत (युएपीए) गुन्हा दाखल झाला होता. २०१८ पासून त्या मुंबईच्या भायखाळा तुरुंगात अंडरट्रायल आहेत.

या प्रकरणातील इतर आरोपींपैकी वकील सुधा भारद्वाज, कवी-लेखक पी. वरावरा राव, नागरी हक्क कार्यकर्ते डॉ आनंद तेलतुंबडे, कामगार कार्यकर्ते वर्नन गोन्साल्विस, वकील अरुण फरेरा यांचा समावेश आहे. फरेरा यांना आतापर्यंत जामीन मिळाल होता. आणखी एक सहआरोपी, आदिवासी हक्क कार्यकर्ते आणि फादर स्टॅन स्वामी यांचाही समावेश होता. सात महिन्यांहून अधिक काळ तुरुंगात राहिल्यानंतर तिथेच जून २०२१ मध्ये कोविडमुळे त्यांचे निधन झाले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!