झारखंड जामतारातील काळझारिया रेल्वे स्थानकावर १२ प्रवाशांना ट्रेनने चिरडले

झारखंड जामतारा येथील काळझारिया रेल्वे स्थानकावर झालेल्या अपघातात सुमारे १२ जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. अंग एक्सप्रेसला आग लागल्याची अफवा कळाल्यानंतर काही प्रवासीयांनी रेल्वेतून उडी मारून दुस-या ट्रकवर गेले. दरम्यान, या ट्रॅक वरुन येणारी झाझा – आसनसोल रेल्वे खाली चिरडले गेले.
अद्याप या अपघातात मृतांचा नेमका आकडा समोर आला नसला तरी सुमारे १२ जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. या अपघातानंतर वैद्यकीय पथके आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या असून जखमींना तातडीने जवळील रुग्णालयात नेण्यात आले आहे.
स्थानिकांनी दिली माहिती…
झारखंड जामतारा येथील काळझारिया रेल्वे स्थानकावर झालेल्या अपघातात अनेक जण गंभीर जखमी झाले असून जखमींना तातडीने जवळील रुग्णालयात नेण्यात आले आहे. दरम्यान स्थानिक नागरीक देखील बचाव कार्यात पोलिसांना मदत करत आहेत.
जामताडा आणि करमाटांडच्या दरम्याव कालाझरिया रेल्वे हॉल्टवर आसनसोल-झाझा ट्रेन थांबली होती. याच ट्रेनमधून प्रवासी खाली उतरले होते. दरम्यान भागलपूर-यशवंतपुरम एक्सप्रेस तिथून जात होती. यावेळी रेल्वे ट्रॅकवर उभ्या असलेल्या अनेक प्रवाशांना ट्रेनने चिरडले असल्याची माहिती येथील स्थानिकांनी दिली आहे.
दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी : www.mahanayakonline.com
Join with Mahanayak Online WhatsApp Group: https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ
MahanayakOnline www.mahanayakonline.com
For advertising call now: 9421379055 | 9028150765