मनोज जरांगेंला तत्काळ अटक करा, अधिवेशनात भाजप नेते प्रवीण दरेकर यांची मागणी

गेल्या काही महिन्यांपासून मराठा आरक्षणाची मागणी करत शांततेत आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटलांनी अचानक आक्रमक पवित्रा घेतला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप करत जरांगेनी थेट मुंबईतील सागर बंगल्यावर धडकण्याचा इशारा दिला होता. जरांगेंच्या या आक्रमक पवित्र्यामुळे मराठा समाजही आक्रमक झाला आहे. दरम्यान, या घटनेचे पडसाद विधीमंडळाच्या विशेष अधिवेशनातही उमटले आहेत.
भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात सभागृहात आक्रमक पवित्रा घेतला आहे. राज्य सरकारने मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण दिल्यानंतरही महाराष्ट्रात हिंसक आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटलांना तत्काळ अटक करा, अशी मागणी भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी आज विधानपरिषदेत केली.
राज्यात अशांतता आणि अराजकता पसरवली जात आहे असं सांगत हा कट रचण्यामागचा सूत्रधार शोधून काढायला हवे, तसेच याप्रकरणी गुन्हा दाखल करून एसआयटी मार्फत चौकशी करावी, असंही प्रवीण दरेकर यांनी म्हटले आहे.
दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी : www.mahanayakonline.com
Join with Mahanayak Online WhatsApp Group: https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ
MahanayakOnline www.mahanayakonline.com
For advertising call now: 9421379055 | 9028150765