Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

रतीय राष्ट्रीय लोकदल पक्षाचे हरयाणाचे प्रमुख नफेसिंह राठी यांची गोळ्या झाडून हत्या

Spread the love

हरयाणा : रतीय राष्ट्रीय लोकदल पक्षाचे हरयाणाचे प्रमुख नफेसिंह राठी यांची रविवारी अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली. बहादूरगडमध्ये या हल्ल्यात पक्षाच्या आणखी एका कार्यकर्त्याचा मृत्यू झाला आहे. राष्ट्रीय लोकदलाचे नेते अभय चौटाला यांनीही पक्षकार्यकर्त्याच्या मृत्यूला दुजोरा दिला आहे.

ह्युंदाई आय १०मधून आलेल्या हल्लेखोरांनी राठी यांच्या एसयूव्हीवर गोळीबार केला. या हल्ल्यात अनेक सुरक्षारक्षकांनाही गंभीर जखमा झाल्या आहेत. सीआयए आणि एसटीएफ पथकाने तपासाला सुरुवात केली असून लवकरच आरोपींना अटक केली जाईल, असा विश्वास झज्जरचे पोलिस अधीक्षक अर्पित जैन यांनी व्यक्त केला. या हल्ल्यात जखमी झालेल्यांना ब्रह्मशक्ती संजीवनी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

चार जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव झाल्याने त्यातील दोघांना आम्ही वाचवू शकलो नाहीत, असे डॉक्टरांनी सांगितले. नफेसिंह राठी यांच्यावर अनेक गोळ्या झाडण्यात आल्याचे डॉ. मनीष शर्मा यांनी सांगितले आहे. तर, अन्य दोन जखमींच्या खांदा, छाती आणि मांड्यांना गोळ्या लागल्या असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.

राठी यांच्या जीवाला धोका असल्याचे वारंवार सांगूनही राज्य सरकारने त्यांना सुरक्षा पुरवली नाही, असा आरोप अभय चौटाला यांनी केला आहे. या घटनेनंतर चौटाला यांनी हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर आणि गृहमंत्री अनिल विज यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

हरयाणाचे माजी मुख्यमंत्री भूपिंदर हुडा यांनीही राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडल्याची टीका केली. काँग्रेसच्या माजी खासदार कुमारी सेल्जा यांनीही राठी यांच्या मृत्यूबद्दल खेद व्यक्त करून भाजपने राज्यात जंगल राज निर्माण केले असल्याचा आरोप केला.

 

 


दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी :  www.mahanayakonline.com

Join with Mahanayak Online WhatsApp Group: https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ

MahanayakOnline  www.mahanayakonline.com

For advertising call now: 9421379055 | 9028150765

आपलं सरकार

Click to listen highlighted text!